Vidhansabha Election : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर आल्याने जागावाटपासंदर्भात पक्षांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) ठाकरे गट मोठ्या भावाच्या भूमिकेत राहणार आहे. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मुंबईतून सर्वाधिक जागा मिळतील. मुंबईत ठाकरे गटाला (UBT) जास्त जागा देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत जागावाटपा संदर्भात चर्चा झाल्याचे वृत्त आहे. मुंबईत मविआकडून ठाकरेंची शिवसेना सर्वाधिक जागा लढवणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 20 ते 22 जागांवर दावा केल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळं ठाकरे गटच जागा वाटपात मोठा भाऊ असणार आहे. ठाकरे गटाला अधिक जागा देण्याबाबत काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सकारात्मक आहेत.
Prajwal Revanna : मोठी बातमी! प्रज्वल रेवण्णाविरोधात 2 हजार पानांचे आरोपपत्र दाखल
मुंबईत ठाकरे गटाला मिळणार जनाधार आणि लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मिळालेले मोठं यश यामुळे ठाकरे गटाने आघाडीकडे सर्वाधिक जागा मागितल्याचे सूत्रांनी सांगितले.
ठाकरे गटाने 20 ते 22 जागांसाठी आग्रह धरला आहे. तर काँग्रेसने 13 ते 15 जागांसाठी आग्रही आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा पाच ते सात जागांवर दावा करत आहे. काही जागा अद्याप अनिर्णित आहेत. मुंबईतील काही जागांवर महाविकास आघाडीतील दोन्ही तर काही जागांवर तिन्ही पक्ष दावा करत आहेत. त्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी पुन्हा महाविकास आघाडीची बैठक होणार आहे.
दरम्यान, या बैठकी संदर्भात शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबईत शिवसेना हा मोठा भाऊ असेल, यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही. जे सत्य आहे, ते सत्य आहे. आजच्या बैठकीत केवळ राजकीय चर्चा झाली. बदलापूर घटनेचे महाराष्ट्र किंवा मुंबईत काय परिणाम होतील यावरही चर्चा झाली, असं सांगत बदलापूरची घटना भयंकर असून मानवतेला काळिमा फासणारी ही घटना असल्याचं आव्हाड म्हणाले.
महायुतीत अजितदादा गट 7 जागा लढवण्याच्या तयारीत…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतील 7 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच मुंबईतील जागांचा महायुतीकडे प्रस्ताव देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईतील मुंबादेवी, भायखळा, अणुशक्तीनगर, चेंबूर, मानखुर्द-शिवाजीनगर, वांद्रे पूर्व आणि विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे.