Download App

सत्ताधारी भाजपविरोधात विरोधकांचा जागर?

सत्ताधारी भाजपच्या विरोधात देशभरात विविध विचारांच्या लोकांचा जागर सुरु असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. यामध्ये देशातील पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, बिहार, केरळ, राजस्थान राज्यांमध्ये सत्ताधारी सरकारविरोधात रणनीती आखली जात असल्याचं दिसून येतंय.

देशातील विरोधी पक्षांची नेमकी दिशा काय? असा प्रश्न पडला असतानाच देशातील विरोधी पक्षांचे एक संमेलन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या राज्यात भरवले आहे. यावेळी अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, केरळचे पिनाराई विजयन असे नेते उपस्थित या संमेलनात उपस्थित राहिले होते.

देशातील विरोधी पक्षाचे नेते एकवटले असून भाजपविरोधात त्यांनी एल्गार पुकारलाय. मात्र, देशातील अधिकतर राज्यांनी मनावर घेतले तर इतर राज्यांतही जागरण होणार असून प्रत्येकालाच नव्या स्वातंत्र्याची व क्रांतीची मशाल पेटवायची आहे. या सर्वांना भाजपपेक्षाही काँग्रेस पक्ष पहिल्या क्रमांकाचा राजकीय शत्रू वाटतो आणि हा विचार विरोधकांच्या कोणत्याही आघाडीस मजबुती देणारा नाही.

देशाचे संविधान, न्यायालयाचेही खासगीकरण सुरू असताना विरोधकांची तोंडे दहा दिशांना कशी राहू शकतात? त्यांचे पाय दोन, त्यामुळे रस्ता एकच, पण बोलणे, विचार करणे सुरू आहे. राष्ट्रीय राजकारण करू पाहणारे हे सर्वच पक्ष प्रांतीय आहेत. त्यांना काँग्रेसला दूर ठेवायचे आहे. काँग्रेसची भीती त्यांना का वाटावी? काँग्रेस पक्षाच्या खासदारांचा आकडा ‘शंभर’ पार करणे गरजेचे आहे. आज ही क्षमता फक्त काँगेसमध्येच आहे. काँगेस शंभर पार झाली की दिल्लीतील सध्याचा डोलारा सहज कोसळेल.

राहुल गांधी यांची देशातील हुकूमशाही प्रवृत्तीविरुद्ध जी ‘भारत जोडो’ यात्रा सुरू आहे, ती दिल्ली व लखनौला पोहोचली तेव्हा याच लोकांनी त्या यात्रेकडे पाठ फिरवली होती. कागदी शुभेच्छा व प्रत्यक्ष सहभाग यात फरक आहे. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेस लोकांचे समर्थन मिळत आहे, याचे भय भाजपास वाटायला हवे. हिंदू विरुद्ध मुसलमान व भारत विरुद्ध पाकिस्तान हाच त्यांचा राजकीय कार्यक्रम आहे. न्यायालयाविरुद्ध सरकार अशा संघर्षाची ठिणगी पडली आहे. शेतकरी अस्वस्थ आहे. याचा फायदा विरोधक एकजुटीने घेत नसतील तर कसे चालेल?

मेळावा भरवून राष्ट्रीय राजकारणाचा एल्गार करीत आहेत, ते एकप्रकारे भारतीय जनता पक्षाचा 2024 चा मार्ग मोकळा करीत आहेत. के. सी. चंद्रशेखर राव यांचा हेतू प्रामाणिक असेलही, पण त्यांना तटस्थपणे भूमिका घ्यावी लागेल. त्यांच्या सभेला प्रचंड गर्दी जमली. ही गर्दी म्हणजे देशातील मोठय़ा बदलाचे संकेत आहेत असे त्यांना वाटत आहे. श्री. गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेसही प्रचंड गर्दी राज्याराज्यांत होत आहे, पण गर्दी झाली तरी काँगेस पक्ष जमिनीवर किती उरलाय, हे त्यांना पाहावे लागेल.

आता डोके ठिकाणावर ठेवून जमिनीवरील सत्य समजून पावले टाकावी लागतील. तसे घडले तर 2024 ला नक्कीच बदल होईल. नाही तर शंभर आचारी रस्सा भिकारी असेच घडेल. लोकसभा निवडणुकीसाठी 400 दिवस उरलेत, असे मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना सांगितले. देशातील विरोधी पक्षांनासुद्धा तोच इशारा असणार आहे. दरम्यान, हा विषय फक्त निवडणुकांचा नाहीतर फोफावलेल्या हुकुमशाही प्रवृत्तीचा असून विरोधकांनी समन्वयाची भूमिका घेतली नसल्याचं फळ गुजरात, गोवा निवडणुकामध्ये दिसून आलंय. आता विरोधकांनी समन्वयाची भूमिका घेतली घ्यायला हवी, याबाबत सामनाच्या अग्रलेखात म्हंटलंय.

Tags

follow us