Download App

अजितदादांचा शिवतारेंना पुन्हा धोबीपछाड, नीरा बाजार समितीच्या निवडणुकीत सुपडासाफ

Neera Apmc Elections : माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अजित पवार आणि विजय शिवतारे आमने-सामने आले होते. ही निवडणूक दोन्ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनली होती. यात महाविकास आघाडीच्या पॅनलने युतीच्या पॅनलचा सुपडासाफ केला होता. नीरा बाजार समितीवर महाविकास आघाडीने 18-0 असे वर्चस्व निर्माण केले आहे.

सत्ताधारी महाविकास आघाडीने सुरुवातीलाच व्यापारी मतदारसंघातील जागा बिनविरोध पटकावल्या. त्यानंतर 16 जागांच्या लढतीत युतीन आव्हान दिले होते. सोसायटी मतदासंघात महाविकाआघाडीने 987 ते 1300 मतांच्या फरकाने युतीला धूळ चारली. तोलारीच्या जागेवरही 47 मतांच्या फरकाने विजय मिळविला आहे.

कोल्हापूरच्या अमृता पुजारीला आस्मान दाखवत, अहमदनगरची भाग्यश्री ठरली महाराष्ट्र केसरी

दरम्यान, ग्रामपंचायत मतदारसंघात मात्र युतीने सत्ताधाऱ्यांच्या नाकीनऊ आणले. यामध्ये महाविकास आघाडीने 64 ते 117 अशा फरकाने विजय प्राप्त केला. युतीला सासवड, जेजुरी, नायगाव, परिंचेतून चांगली मते मिळाली.

नीरा बाजार समितीच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या नेतृत्वातील पॅनलचे नेतृत्व आमदार संजय जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केले. तर युतीच्या पॅनलचे नेतृत्व माजी मंत्री विजय शिवतारे. भाजप नेते जालिंदर कामठे, गंगाराम जगदाळे यांनी केले होते.

Tags

follow us