Download App

बंडाची बिजं शिंदेंच्या मनात मीच पेरली, विजय शिवतारेंचा गौप्यस्फोट

  • Written By: Last Updated:

पुणे : शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदेंनी बंड का केलं? या बंडाची बीजं कोणी पेरली यासंदर्भात अनेक तर्कविर्तक लावले जात होते. परंतु विजय शिवतारे यांच्या दाव्यानंतर या चर्चांना वेगळं वळणं मिळालं आहे.

बंडाची बीजं मीच एकनाथ शिंदेंच्या मनात पेरली असा दावा माजी आमदार आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला आहे. तसेच, उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी निवडणुकीपूर्वीच ठरवली होती, असाही गौप्यस्फोट विजय शिवतारेंनी केला आहे.

विजय शिवतारेंचा एक व्हिडीओ समोर आलाय, त्यामध्ये ते म्हणालेत की, “ही महाविकास आघाडी नंतर नाही झाली, आतलं खोल राजकारण सांगतो तुम्हाला 70 सीट तुमच्या आमच्या निव्वळ आम्हाला लढवून घालवल्या आणि त्या उद्धव ठाकरेंनीच घालवल्यात. महाविकास आघाडी नंतर नाही झाली, फसवतायत लोकांना अगोदरच झाली होती.”

उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी निवडणुकीपूर्वीच ठरवली होती, असा आरोप शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर समझोता झाल्याचं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडी विरोधात उठाव करायचं बीज एकनाथ शिंदे यांच्या मनात मीच पेरल होतं, असं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. साडेचार तास नंदनवनमध्ये बसून मी शिंदे यांना तयार केल्याचा दावाही विजय शिवतारे यांनी काल सासवडमध्ये केला आहे.

Tags

follow us