Download App

Vijay Vadettiwar : पुन्हा येऊ शकत नाही, हे माहिती असल्याने ट्विट डिलिट; वडेट्टीवारांचा टोला

Image Credit: Letsupp

Vijay Vadettiwar : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या ट्विटवरून टोला लगावला आहे. ते म्हणाले की, पुन्हा येणारं अस ट्विट असेल आणि ते डिलिट केले. तर मी पुन्हा येऊ शकतं नाही. हे माहिती असल्याने केले असावे. असं वडेट्टीवार म्हणाले आहेत. ते माध्यमांशी बोलत होते.

पुन्हा येऊ शकतं नसल्याने ट्विट डिलिट…

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष विजय वडेट्टीवार हे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासह देवेंद्र फडणवीसांच्या पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या ट्विटवर निशाणा साधला ते म्हणाले की, ‘पुन्हा येणारं अस ट्विट असेल आणि ते डिलिट केले तर मी पुन्हा येऊ शकतं नाही. हे माहिती असल्याने केले असावे.एक बाशिंग बाधून तर दोन तयार आहे. सत्ता येणार नसल्याने हे नवरदेव का होऊन बसतं आहे?आताच सरकार केवळ अध्यक्षांच्या भरवशावर आहे.2024 मध्ये माविआ सत्तेत येईल त्याला कोणी रोखू शकणार नाही. तर या ट्विटवरून काही तरी शिजत आहे. हे सहज केलेले ट्विट आहे. असं मला वाटत नाही. असं देखील ते यावेळी म्हटले आहे.

Rohit Pawar : ‘तुम्ही मंत्रिपद खेळत राहा, लोकच तुम्हाला’.. रोहित पवारांचा फडणवीसांना इशारा

पुढे मराठा आरक्षणावर वडेट्टीवार म्हणाले की, यापूर्वीही मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा केंद्राला विचारून नव्हता.आरक्षणावरून स्थिती चिघळत असताना केंद्राने त्यात हस्तक्षेप करणे अपेक्षित असताना ते नकार देत आहेत. आज जी परिस्थिती आहे, त्याला जबाबदार राज्य सरकार आहे. आरक्षण देण्याची ऐपत नसल्याने सरकारने राजीनामा द्यावा. राज्याला अधिकार नसताना त्यांनी कुठल्या भरवशावर मराठ्यांना शब्द दिला? जरांगे पाटील यांनी 40 दिवस सरकारवर विश्वास का ठेवला? राज्य सरकार या काळात केंद्राला भेटायला गेले नाही. साप गेल्यावर आता लाठी मारून काय उपयोग?

Lalu Prasad Yadav Biopic: लालूप्रसाद यादव यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा येणार; प्रकाश झा करणार निर्मिती

तसेच यावेळी अजित पवरांवर बोलताना ते म्हणाले की, प्रस्तावित मराठा समाज लढत आहे. ही वेळ का आली याचे आत्मचिंतन करावे.आरक्षण वेगळा भाग. पण शिक्षणाचे नुकसान करू नये, आयुष्य उध्वस्त करू नये, ही विनंती. महाराष्ट्रात एकच पक्ष सत्तेत आणि विरोधात देखील आहे. दिवा जब बुझता है तो झगझगाता है. तशी यांची स्थिती आहे. निसर्गासाठी वाघ ही जगले पाहिजे. दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे कोण कोणाला भेटतो? हे पाहावं लागेल. सुप्रीम कोर्ट 30 तारखेला आपला निर्णय देईलच.

Tags

follow us

वेब स्टोरीज