Download App

राजा खातोय तुपासी, शेतकरी मात्र उपाशी, जनाची नाही तर निदान…; कॅबिनेटचा तामझाम पाहून वडेट्टीवारांचे टीकास्त्र

  • Written By: Last Updated:

Vijay Vadettiwar on Cabinet meeting : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून (दि. १६) औरंगाबादमध्ये कॅबिनेटची बैठक (Cabinet meeting) पार पडणार आहे. सात वर्षांनंतर मराठवाड्यात प्रथमच होत कॅबिनेट बैठक होत आहे. मराठवाड्यात आतापर्यंत झालेल्या मंत्रिमंडळाची परंपरा महायुतीचं सरकार मोडीत काढणार असल्याचं दिसंत. कारण, मंत्र्यांसाठी थोड्या थोडक्या नव्हे, तर १०० हून अधिक रुम्स फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बुक करण्यात आल्या आहेत. दरम्यान, यावरूनच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

वडेट्टीवार यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला. त्यात त्यांनी सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. ते म्हणाले, राजा खातोय तुपासी, शेतकरी मात्र उपाशी आहे. सरकारने जनाची नाही तर मनाची लाज बाळगायला हवी. कॅबिनेटच्या बैठकीसाठी सर्व मंत्री औरंगाबादला येत आहेत. कॅबिनेटची फाईव्ह स्टार हॉटेलला व्यवस्था करणारं हे पहिल सरकार आहे. मराठवाड्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झाला आहेत. १९६ तालुके दुष्काळाच्या छायेत आहेत. मराठवाडाही दुष्काळाच्या छायेत आहेत. आणि कॅबिनेटची बैठक फाईव्ह स्टार हॉटेलला होतेय. त्यामुळं हे मंत्री मराठवाड्याला देण्यासाठी येतात की, पर्यटनाला येत आहेत? असा सवाल त्यांनी केला.

https://x.com/VijayWadettiwar/status/1702610701083361446?s=20

ते म्हणाले, याआधी कॅबिनेट बैठका झाल्या. कुठलंही सरकार आणि त्यांचे मंत्री फाईव्ह स्टार हॉटेलला थांबले नव्हतं. फाईव्ह स्टार हॉटेलचा पाहूणचार घेतला नव्हता. रेस्ट हॉऊसला थांबून कॅबिनेटच्या बैठका घेतल्या.

2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी मराठवाड्यासाठी 49 हजार 800 रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. त्याचं काय झालं? सरकारने आधी या पॅकेजबद्दल सांगावं, नंतरच नव्या पॅकेजबाबत बोलावं, अस म्हणत वडेट्टीवारांनी फडणवीसांची कोंडी केली.

वडेट्टीवारांनी या कॅबिनेटच्या बैठकीचा थाट कसा असणार याचाही तपशील दिला-
फाईव्ह स्टार हॉटेल 30 रुम बुक (मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री)

ताज हॉटेल 40 रुम बुक (सर्व सचिव)

अमरप्रीत हॉटेल 70 रूम बुक (उपसचिव, खाजगी सचिव, कक्ष अधिकारी)

अजंता अॅम्बेसेडर 40 रूम बुक (उपसचिव, खाजगी सचिव, कक्ष अधिकारी)

महसूल प्रबोधिनी 100 रुम (सुरक्षा रक्षक, चालक)

पाटीदार भवन 100 (सुरक्षा रक्षक, चालक)

वाल्मी, सिंचन, महावितरण, सुभेदारी विश्रामगृह – 20 (इतर अधिकारी)

औरंगाबाद शहरातील देखील 150 गाड्या भाड्याने घेतल्या आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीसाठी जेवणाचे कंत्राट नम्रता केटर्सला देण्यात आले असून एका थाळीची किंमत 1,000 ते 1,500 रुपये असेल.

 

 

follow us