Download App

बोरवणकरांनी केलेल्या आरोपाची उच्चस्तरीय चौकशी करा, विजय वडेट्टीवार आक्रमक

  • Written By: Last Updated:

Vijay Wadettiwar On Ajit Pawar :  माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी अजित पवार यांचे नाव न घेता ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकातून त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. येरवडा कारागृहाशेजारील पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तीन एकर जागा खासगी बिल्डरला देण्याचा अजित पवारांचा आग्रह असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, यावरून विरोधकांनी अजित पवारांवर (Ajit Pawar) जोरदार टीका केली. तर आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी यावर भाष्य केलं.

TCS नोकरीभरती प्रकरणी कडक कारवाई, कंपनीने 16 कर्मचाऱ्यांना दिला नारळ 

आज माध्यमांशी बोलतांना त्यांना मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपाविषयी विचारलं असता ते म्हणाले की, मीरा बोरवणकर यांनी आपल्या पुस्तकातून अजित पवारांवर आरोप केले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हे आरोप केल्यानं यात तथ्य असू शकतं. कारण, यापूर्वीही अनेकदा अजित पवारांवर आरोप झाले आहेत. त्यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरुपाचे आरोप झालेले आहेत. त्या आरोपांच्या सध्या चौकशी सुरू आहेत. फरक इतकाच की, आत्ता सत्तेत गेल्यानं त्या चौकशाली ब्रेक लागला असेल. आज जे अजित पवारांसोबत सत्तेत आहे, त्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपवरून अजित पवारांच्या नावाने रोजच शिमगा आणि होळी केली, असं वडेट्टीवार म्हणाले.

पुढं बोलतांना ते म्हणाले, आरोप करणााऱ्या मीरा बोरवणकर ह्या माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी राहिलेल्या आहेत. एक आयपीएस अधिकारी असे आरोप करत असतील तर त्याची उच्चस्तरीय चौकशी करावी. चौकशी केली तर दुध का दूध, पाणी का पाणी होईल, असंही वडेट्टीवार म्हणाले.

राष्ट्रवादीने 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका कार्यक्रमात म्हटलं होतं. त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केलं आणि ते सत्तेत सहभागी झाले आहेत. यावरूनही वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
विकासासाठी सत्तेत गेलो असं सांगितल्या जातं, मात्र, तसं नसून ईडीच्या धाकानेच अजित पवार हे सत्तेत गेले आहेत. जेलमध्ये गेल्यापेक्षा सत्तेत जाण्याचा पर्याय त्यांनी निवडला, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, माजी विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी बोरवणकर यांनी केलेल्या आरोपासंदर्भात खुलासा केला. अजित पवार यांचा पुण्यातील जागेशी संबंध नाही. त्या जागेचा संपूर्ण प्रस्ताव गृहमंत्र्यांकडून आला आहे होता, असं ते म्हणाले. त्यामुळं या प्रकरणात पुढं काय होतं, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us