Download App

महाराष्ट्रातील दंगलीच्या घटना हा BJP चा निवडणूक प्लॅन; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा आरोप

Violence in Maharashtra is BJP’s Lok Sabha election plan : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात विविध ठिकाणी दंगलीच्या घटना घडतांना पहायला मिळत आहेत. छत्रपती संभाजी नगर येथून सुरू झालेले दंगलीचे लोण आता हळूहळू राज्यभर पसरत आहे. दरम्यान, शनिवारी दोन गटात झालेल्या वादानंतर अकोल्यातील हरिहरपेठ परिसरात संचारबंदी (curfew) लागू करण्यात आली आहे. तर काल अहमदनगरच्या शेवगावमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीत दगडफेक झाली. त्यामुळेच राज्यात घडणाऱ्या दंगलीच्या घटना पाहता लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) भाजपचा (BJP) हा डाव असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला आहे.

खैर यांनी बोलतांना सांगितलं की, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदार प्राधान्य देणार आहेत. कारण, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यात कुठेही जातीय तेढ निर्माण होऊ दिली नाही. मात्र आता छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि शेवगाव येथे दंगली पेटल्या. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सामाजिक वातावरण बिघडवले जात आहे, असं ते म्हणाले.

लोकसभा अन् विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी, अजित पवारांनी सांगितलं सरकारच्या मनातलं

खैरेंनी बोलतांना सांगितलं की, हे सर्व देवेंद्र फडणवीस यांच्या गृहमंत्रीपदाच्या कार्यकाळात घडत आहे. हिंदू-मुस्लीम वेगळे करण्याचे राजकारण त्यांच्याकडून सुरू आहे. मुस्लीम समाज महाविकास आघाडीच्या आणि उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मतदार हे महाविकास आघाडीला मते देतील, अशी भीती भाजपला असल्यानं ह्या दंगली घडवल्या जात आहेत. मविआ आणि उद्धव ठाकरेंना मुस्लिम मते मिळू नयेत यासाठी हे सर्व प्रकार घडवले जात आहेत. या सर्व घटना म्हणजे भाजपचा लोकसभा निवडणुकीचा डाव असल्याचे चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधील दोन गटातील वादाला भाजपही जबाबदार असल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी 17 दिवस उपोषण करण्यात आले. भाजपच्या लोकांनी जलील यांच्याकडून हे उपोषण करून घेतले. त्याच वेळी काही मुस्लिम लोक नामांतरणाच्या विरोधात उभे राहिले. त्यातून वातावरण निर्मिती झाल्याचेही खैरे म्हणाले.

Tags

follow us