Vishal Patil On Sanjay Kaka Patil : आपण एका खासदाराला निवडून दिलं. निवडून येण्याआधी भाजप खासदाराने जनतेला अनेक आश्वासनं दिली. जनेतचं उत्पन्न दुप्पट करणार असं सांगितलं. मात्र, निवडून आल्यावर खासदार फक्त आपल्याच फिकरीत राहिला. कोणत्या जागेवर मला कब्जा टाकता येईल, हेच टार्गेट खासदार दिवसभर ठेऊन असतो, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील (Vishal Patil) यांनी सांगलीचे खासदार संजयकाका पाटील (Sanjay Kaka Patil) यांच्यावर केला आहे. (Vishal Patil said The MP’s target is to increase the property by occupying the land)
सांगली शहरात आज काँग्रेस पक्षातर्फे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. सांगलीत काँग्रेसचा महानिर्धार मेळावा पार पडला. कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे प्रमुख पाहुणे म्हणून या मेळाव्याला उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात बोलतांना विशाल पाटील म्हणाले, आपण एका खासदाराला निवडणून दिलं. निवडून येण्याआधी भाजप खासदाराने जनतेला अनेक आश्वासनं दिली. जनेतचं उत्पन्न दुप्पट करणार असं सांगितलं होत. आज खासदाराने जनतेकडे पाठ फिरवली. जनता देशोघडीला लागली. महागाईने जनता बेजार झाली. आणि हा खासदार फक्त इतरांच्या जमिनीवर कब्जा टाकून प्रॉपर्टी जोडत राहिला. निवडून आल्यावर खासदार फक्त आपल्याच फिकरीत राहिला. कोणत्या जागेवर मला कब्जा टाकता येईल, हेच टार्गेट खासदार ठेवून असतो. त्यामुळं आता या खासदाराला पाडायची वेळी आली आहे, असं पाटील म्हणाले.
तावडे, तापकीर अन् जाधव : राजकीय विरोधक झाले पंढरीच्या वाटेवर ‘वारकरी’
सांगलीतील स्थानिक काँग्रेसबद्दल बोलताना विशाल पाटील म्हणाले की, मधल्या काही काळात आमच्यातल्या हेवेदाव्यामुळं आणि मीच मोठा नेता आहे, या भावनेमुळं आम्हीच काँग्रेसचे खूप नुकसान केलं. केवळ काँग्रेसच काँग्रेसला पाडू शकतं, दुसरं कोणी कॉंग्रेसला पाडू शकत नाही. पण आता पक्षातल्या मोठ्या लोकांनी आमची समजूत काढली. आज या ठिकाणी आपल्याला निर्धार करायचा आहे. आम्ही भाऊ म्हणून एकत्र काम करू. विश्वजित कदम यांनी नेतृत्व करावे, वसंतदादा घराणं पूर्ण ताकदीने त्यांचया पाठिशी उभं राहील. कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांनी जी वज्रमुठ बांधली. त्याचप्रमाणे, विश्वजीत कदम यांच्या पाठीशी विशाल पाटील पूर्ण ताकतीने उभा राहणार आहे, असं पाटील म्हणाले.
सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात येण्यासाठी सांगली जिल्ह्याची निवड केली. आता काँग्रेसची लाट निर्माण होत आहे. येत्या निवडणुकीतही याच ताकदीने आपण लढत राहिलो तर निश्चितच विजय आपला होणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.