दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्र अद्याप सावलेला नाही. कोणत्या ना कोणत्या विषयावरुन अजित पवार यांच्या आठवणी जागवल्या जात आहे. अशातच वारीत एकाक महिला वारकऱ्याच्या हातातल्या फलकाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. माझ्या विठ्ठलाला परत द्या..अशा आशयाचा हा फलक असून महिला वारकऱ्याने दिंडीत हातात घेतला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे.
E20 पेट्रोलवरून वाद तीव्र; नीती आयोगाच्या 2021 च्या अहवालाचा दाखला देत काँग्रेसचे सरकारला सवाल
लोणंदमध्ये एका महिला वारकऱ्याच्या हातात असलेल्या या फलकाने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. फलकावर अजितदादा टाळ वाजवतानाचा फोटो असून अजितदादा वारकऱ्यांच्या वेशात आहेत. एवढाच निरोप सांगा पांडुरंगाला, परत पाठव देवा माझ्या विठ्ठलाला, असं या फलकावर लिहिलं आहे. हा फ्लेक्स हातात घेऊन महिला वारकरी वारीत सहभागी झाल्या आहेत. अजित पवार यांच्या या बॅनरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने वारकऱ्यांसाठी सेवाभाव देहू ते पंढरपूरपर्यंत करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरपर्यंत वारकऱ्यांसाठी सेवाभाव करण्यात येत असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिलीय. लाख मेले तरी लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे होता. दादा आज तुकोबांचा पालखी सोहळा आहे आणि तुम्ही आमच्यात नाहीत. विठ्ठला दादांना परत पाठवा, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवेमध्ये वारकऱ्यांच्या पायाची मालिश, सर्व आरोग्याच्या संबंधित सेवा पालखीमध्ये देण्यात येत आहे.
