सर्वोच्च न्यायालयाने हे सरकार डिसमिस करुन फाशी सांगितली अन् जल्लादाचं काम विधानसभेच्या अध्यक्षांना करावं लागणार असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, शिवसेना शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत.
WTC Final: अक्षर पटेलचा बुलेटच्या वेगाने थ्रो, डोळ्याची पापणी लवताच मिचेल स्टार्क बाद, पहा व्हिडिओ
संभाजीनगर दौऱ्यावर असतानाच संजय राऊतांनी छोटेखानी सभेत बोलताना सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल एका वाक्यात सांगितला आहे. राऊत पुढे बोलताना म्हणाले, जो माणूस तुरुंगात जाऊन येतो, तो बॅरिस्टर होऊन बाहेर पडतो. सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने जो काही निकाल दिला आहे तो संपूर्ण वाचण्याची गरजच नाही.
सर्वोच्च न्यायालयाने फाशी सांगितलीय, त्यानंतर हे प्रकरण विधानसभेत आलं असून आता जल्लादाचं काम विधानसभेच्या अध्यक्षांना करावं लागणार आहे. हा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा साधा, सरळ अर्थ असल्याचं ते म्हणाले आहेत. आपण सध्या काय ऐकतोयं, सर्वोच्च न्यायालयाने प्रतोद बेकायदेशीर ठरवला, त्यानंतर राज्यापाल भगतसिंह कोश्यारींची कार्यवाही बेकायदेशीर ठरवली. हे सर्व ठीक पण सर्वोच्च न्यायालयाने हे सरकार डिसमिस केलं असल्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.
Satara : ‘कार्यक्षम जिल्हाधिकारी’ पुरस्कार मिळाला अन् 48 तासांतच तडकाफडकी उचलबांगडी
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर टीकेची तोफ डागली आहे. ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांना सोडून गेलेले नेते पुन्हा राजकारणात दिसलेच नसल्याचं ते म्हणाले आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथल्या शिवसेनेच्या शाखेचा 38 वा वर्धापनदिनानिमित्त संजय राऊत बोलत होते.
https://www.youtube.com/watch?v=YExnJdZGojU
तसेच फडणवीस आपण पाच वर्षांपूर्वी आपण राज्याचे मुख्यमंत्री होते. दिल्लीत जाऊन जबाबदारी पार पाडाल असं आम्ही आपल्याकडे पाहत होतो पण फौजदाराचा शिपाई झाल्याचे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणीसांवरही टीकेची तोफ डागली.