Download App

Nana Patole की बाळासाहेब थोरात नेमकं कुणाचं चुकतंय ? काँग्रेसच्या ‘या’ नेत्याने केला गौप्यस्फोट

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सध्या जे सुरु आहे, ते अतिशय अनपेक्षित आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे त्यांच्या रोखठोक स्वभावामुळे ओळखले जातात. दुसरीकडे काँग्रसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे त्यांच्या संयमी स्वभावामुळे ओळखले जातात. दोन्ही नेते हे त्यांच्या जागेवर अतिशय प्रतिष्ठावंत आहेत. पण याच दोन बड्या नेत्यांमध्ये वाद उफाळल्याने काँग्रेसमध्ये सारं काही बिनसलं झाल्याचा स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या वाद आता चव्हाट्यावर आला.

सत्यजीतसाठी दिल्लीच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांशी बोललो. सत्यजीतला पाठिंबा देण्यास सर्वांची तयारी होती. मात्र अचानक शेवटच्या दिवसांत राजकारण झालं. मला अंधारात ठेवून सगळ केले असल्याचा, आरोप बाळासाहेब थोरातांनी केलाय. यावर कॅबिनेट मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांनी गौप्य्स्फोट केला.

नेमका वाद काय? नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरुन काँग्रेसमध्ये गोंधळ निर्माण झाला. सुधीर तांबेंना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. पण सुधीर तांबेंचा एबी फॉर्म राहून देखील अर्ज भरला नाही. सुधीर तांबेंएवजी नाशिकमधून त्यावेळी सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला. पक्षविरोधी काम केल्याने काँग्रेसने तांबे पिता- पुत्रांवर कारवाई केली. या कारवाईनंतर काँग्रेसमधील अंतर्गतवाद चव्हाट्यावर आला.

नाशिक पदवीधर निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत बाळासाहेब थोरात आणि सत्यजीत तांबे यांनी मौन बाळगलं. पण नाना पटोले आणि इतर नेत्यांकडून सत्यजीत तांबेंवर आरोप करण्यात आले. त्यानंतर सत्यजीत तांबे पदवीधर निवडणुकीत अपक्ष म्हणून विजयी झाले. निवडणुकीत जिंकल्यानंतर सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेत नाना पटोले यांच्यावर आरोप करण्यात आला.

बाळासाहेब थोरात यांची भूमिका काय ? सत्यजीत तांबे माझ्या घरातले आहेत. राजकारणात नाते जपणं अत्यंत महत्त्वाचं असतं. सत्यजीतकरिता मी दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांशी बोललो. सत्यजीतला पाठिंबा देण्यासाठी सगळे तयार होते. मात्र अचानक शेवटच्या दिवसात राजकारण झालं. मला अंधारात ठेवून राजकारण केलं. एच के पाटील यांनाही अंधारात ठेवलं गेलं अशी शंका आहे. नाराजीचं पत्र लिहिल्यावर मला दिल्लीतून फोन आले. माझ्या नाराजीबद्दल दिल्लीतून विचारणा केली गेली.

नाना पटोले यांची भूमिका काय ? आयुष्यात कधी गलिच्छ राजकारण केलं नाही. बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा आला नाही. ज्या पद्धतीचं राजकारण सुरु आहे, तसं राजकारण मी कधी केलेलं नाही. मी सर्वसामान्य घरातून राजकारणात आलो आहे. या पद्धतीचं आडवं- उभं राजकारण मला जमलं नाही. या प्रकरणातून मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. विधान परिषदेच्या निवडणुकीत जसं गलिच्छ राजकारण करण्यात आलं तसं मी नाही करत. तसं मी माझ्या जीवनात देखील करणार नाही.

सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी मागितली नव्हती : नाना पटोले
सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी मागितलीच नव्हती. स्वत: बाळासाहेब थोरात आमच्या पार्लमेंट्री बोर्डात आहे. त्यांनीदेखील हा विषय काढला नाही. मी सुरुवातीलाच यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. हा कुटुंबातला वाद आहे. तो पक्षावर येऊ देऊ नका. त्यामुळे आम्ही कालपर्यंत सोबत चांगलं काम करत होतो. आताच त्यांना काय प्रोब्लेम झाला ? मला माहिती नाही. पण असा प्रोब्लेम होऊ शकत नाही. त्यांचं कुठलं पत्र मिळालेलं नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

Tags

follow us