Download App

Kasba By Election : कोणी सांगितलं गिरीश बापट नाराज आहेत? बावनकुळे संतापले

  • Written By: Last Updated:

पुणे : कसबा विधानसभा (Kasba Peth) पोटनिवडणुकीत नाराजी नाट्य सुरूच आहे. यातच भाजपच्या प्रचारसभांमध्ये गिरीश बापट (Girish Bapat) यांची अनुपस्थिती यामुळे चर्चाना उधाण आले आहे. प्रकृतीच्या कारणास्तव आपण प्रचारात सहभागी नसल्याचे बापट म्हणत असले तरी ते नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहे. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांना विचारले असता ते पत्रकारांवरच संतापले. गिरीश बापट नाराज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले.

सध्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरून राज्याचं राजकारण तापलं आहे. यातच या निवडणुका बिनविरोध न होऊ शकल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. यातच आता भाजपाला पक्षातील नेत्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. या पोटनिवडणुकीच्या प्रचारामध्ये भाजप नेते गिरीश बापट सक्रिय झालेले नाहीत. त्यामुळे गिरीश बापट हे नाराज आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

दरम्यान गिरीश बापट यांची प्रकृती बरी नाही आहे. प्रकृतीच्या कारणास्तव आपण प्रचारात सहभागी नसल्याचे बापट यांनी सांगितले. मात्र याबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना विचारण्यात आले असते ते पत्रकारांवर संतापले. बावनकुळे म्हणाले, कोणी सांगितलं बापट नाराज आहेत? ‘गिरीश बापट नाराज नाहीत ते आमचे नेते आहेत.

नरेंद्र मोदींच्या सुरक्षेवर दिवसाला होतो एवढा खर्च

बापट सध्या आजारी आहेत अशा अवस्थेत त्यांनी प्रचाराला यावं अशी तुमची इच्छा आहे का ? त्यांची कोणतीही नाराजी नाही, आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात आहोत. बापट यांनी निवडणुकांच्या अनुषंगाने आपल्या सर्व कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. असे म्हणतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गिरीश बापट यांच्या नाराजीचं वृत्त फेटाळून लावलं आहे.

Tags

follow us