Download App

दिल्लीचा नवीन मुख्यमंत्री कोण? महिला आमदारालाही संधी मिळू शकते, कारण…

  • Written By: Last Updated:

Who Will Be Next CM Of Delhi : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा (Delhi Election 2025) निकाल आणि भाजपच्या (BJP) दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री कोण असेल? या चर्चांना उधाण आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर दिल्लीत नवीन सरकारचा शपथविधी होईल, अशी शक्यता आहे. परंतु त्यापूर्वी आता मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत विचारमंथन सुरू झालंय. दरम्यान दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री (CM Of Delhi) आमदारांमधूनच असेल किंवा एखादी महिला आमदार देखील मुख्यमंत्र्यांचा चेहरा असू शकते, अशी माहिती समोर येतेय.

दिल्लीतील भाजप हायकमांड सोशल इंजिनिअरिंगची पूर्ण काळजी घेतंय. यासाठी पक्ष उपमुख्यमंत्री देखील नियुक्त करू शकतो, असा अंदाज आहे. त्याचवेळी, मंत्रिमंडळात महिला आणि दलितांचे चांगले प्रतिनिधित्व असू शकते. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत पक्षात विचारमंथन सुरू झालंय.

क्षमाशील सरकार, खुन्यांना मोकळं सोडा; जितेंद्र आव्हाडांचा नेमका कोणावर निशाणा?

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने दोन तृतीयांश बहुमत मिळवलंय. एका दशकानंतर आम आदमी पक्षाला सत्तेतून बाहेर काढण्यात अखेर भाजपला यश मिळालंय. या विजयासह, आता दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. कारण भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा जाहीर न करता निवडणूक लढवली. यासंदर्भात पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून निर्णय घेतला जाण्याची अपेक्षा आहे. या सर्व पैलूंवर विचारविनिमय सुरू असल्याची माहिती मिळतेय.

प्रवेश साहिब सिंग वर्मादिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र प्रवेश साहिब सिंग वर्मा यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा पराभव करून भाजपला मोठा विजय मिळवून दिला. हा आम आदमी पक्षासाठी मोठा पराभव ठरलाय. भाजपचे ज्येष्ठ नेते विजेंदर गुप्ता यांनी दिल्ली भाजपचे प्रमुख म्हणून काम पाहिलंय. ते रोहिणी येथून आमदार म्हणून निवडून आले आहेत. सतीश उपाध्याय यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष, दिल्ली युवा मोर्चाचे प्रमुख आणि एनडीएमसीचे उपाध्यक्ष म्हणून काम केलंय.

विकसित भारतासाठी राजकारणात या; पुण्यात केंद्रीय मंत्र्यांचं तरूणांना आवाहन

भाजपचे पंजाबी चेहरा आशिष सूद हे नगरसेवक राहिलेत. ते दिल्ली भाजपचे सरचिटणीसही राहिले आहेत. जितेंद्र महाजन हे तिसऱ्यांदा आमदार झालेत. याशिवाय भाजपच्या चार महिला दिल्ली विधानसभेत पोहोचल्या आहेत. यामध्ये रेखा गुप्ता, शिखा राय, पूनम शर्मा आणि नीलम पहेलवान यांचा समावेश आहे. त्यामुळे कदाचित पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्रि‍पदाची जबाबदारी एखाद्या महिला आमदारावर देखील सोपवू शकतात, असा अंदाज राजकीय वर्तुळातून वर्तविला जातोय.

 

follow us