उद्धव ठाकरेंच्या काळात आनंदाने तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात नाईलाजास्तव काम केलं असल्याचं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलं आहे. तसेच पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा अजितबातच अनुभव नव्हता, असंही त्यांनी सांगितलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत काम करतानाचा अनुभव सांगितला आहे.
‘ए ट्विटर भैया ! पैसे भर दिए हैं, अब तो नील कमल लगाय दो’, ब्लू टीक गेल्यानंतर बिग बींचे मजेदार ट्विट
अजित पवार म्हणाले, मी आणि पृथ्वीराज चव्हाण 1991 साली खासदार झालो, कराड लोकसभेतून चव्हाण तर बारामती मतदारसंघातून मी खासदार झालो. त्यानंतर श्रीनिवास पाटलांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांना राज्यात काँग्रेसने संधी दिली असल्याचं त्यांनी सांगितलंय.
Sacred Tree in Bali: 700 वर्ष जुन्या वृक्षासमोर ‘या’ अभिनेत्रीचे नग्न फोटोशूट; फोटो व्हायरल
तसेच पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचं अधिक काम दिल्लीत केलं आहे. 2010 साली त्यांना महाराष्ट्रात काम करण्याची संधी मिळाली होती. त्यासोबतच अजित पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांनतर उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या कामाचा अनुभव शेअर केला आहे.
अंबादास दानवे यांना हप्त्याचे रेट माहित कसे? ते त्यात आहेत का? संदीपान भुमरेंचा दानवेंना सवाल
यावेळी ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी आमदार म्हणून कधीही काम केलेलं नव्हतं पण 2019 महाविकास आघाडी झाली होती. त्यावेळी कोणालाही वाटलं नव्हतं की हे तीन पक्ष एकत्र येतील, पण शरद पवार, सोनिया गांधींमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही त्यांच्यासोबत आपलेपणाने काम केलं, दैनंदिन जीवनात आपल्याला कधी आनंदाने तर कधी नाईलाजास्तव काम करावं लागत असल्याचं ते म्हणाले आहेत.