मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शहरी नक्षलवादावर म्हणजे भीमा कोरेगाव संदर्भात दिल्लीतील बैठकीत केस स्टडी वापरा अशा सूचना दिल्या आहेत. असा प्रश्न विचारला असता. ते म्हणाले की, मला याबद्दल काही माहिती नाही. मी यावर माहिती घेऊन बोलतो. असं म्हणत त्यांनी या विषयावर बोलणे टाळले आहे.
‘ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की, भाजप कॉन्फरन्समध्ये आपल्या गडचिरोली पोलिसांच्या कामाचं कौतुक करण्यात आलं आहे. विशेषः आपल्या सी 60 ने गडचिरोलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स केले आहेत. लोकांचा विश्वास कमावला आहे.’ अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते.
‘लोकांशी एक कनेक्ट तयार केला आहे. वस्तूंची डिलिव्हरी देखील ते लोकांपर्यंत पोहचवतात. गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांची नोकर भरती करता येत नाही. बाहेरची माणसं आणावी लागतात. पण जनतेमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास वाढला आहे.’असंही फडणवीस म्हणाले.
‘त्यासाठीच सी 60 आणि गडचिरोली पोलिसांच्या कामाचं कौतुक करण्यात आलं आहे. त्यामुळे मी देखील गडचिरोली पोलीस, सी 60 आणि तेथिल एसपी आणि कमांडंट यांचं देखील अभिनंदन करतो.’ असे म्हणत त्यांनी या पोलिसांचे अभिनंदन केले आहे.