नवी दिल्ली : नागालँडमध्ये (Nagaland) विधानसभेच्या (Assembly Election) 60 जागांसाठी झालेल्या निवडणुकांची मतमोजणी आज झाली आहे. नागालँडमध्ये भाजप-एनडीपीपी (BJP NDPP)युतीला आघाडी मिळाली आहे. त्याचवेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या आरपीआय (आठवले गट) (RPI)पक्षानं नागालँडमध्ये दोन जागांवर विजय मिळवलाय. त्यानंतर आरपीआयचे आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राज्य सरकारमध्ये भागीदारी मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं यावेळी सांगितलंय.
नागालॅंडमध्ये आरपीआयचे दोन उमेदवार निवडून आले आहेत. तीन उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. निवडून आलेले उमेदवार एनडीच्या सरकारला पाठींबा देणार आहेत. आपपीआयला सत्तेमध्ये भागीदारी मिळणार का यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना भेटणार आहे. रिपब्लीकन पक्षाला सत्तेत वाटा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत अशी प्रतिक्रीया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिलीय.
कसब्यात धंगेकरांचा विजय अन् नाशिकमध्ये फटाके फोडून जल्लोष
ईशान्येकडील तीन राज्य मेघालय, नागालँड आणि त्रिपुरामधील निकाल जाहीर झालाय. त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारीला, तर नागालँड आणि मेघालयामध्ये 27 फेब्रुवारीला मतदान पार पडलं होतं.
रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाचे दोन उमेदवार नागालँडमध्ये विजयी झाले आहेत. RPI (आठवले) च्या Y. लिमा ओनेन चँग (Y. Lima Onen Chang) यांनी नागालँडमधील नोक्सेन जागा (Noksen seat) जिंकली आहे. इम्तीचोबा (Imtichoba) यांनी तुएनसांग सदर-II (Tuensang Sadar-II seat) ही जागा जिंकली आहे.