मुंबई : ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)मालेगावमधील (Malegaon)सभेत वीर सावरकर (Veer Savarkar)आमचे दैवत असल्याचे सांगितले. त्यावरुन कॉंग्रेसचे नेते राहुल गांधींनाही (Rahul Gandhi)इशारा दिला आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, सावरकर आमचे दैवत आहेत त्यांचा अपमान आम्हाला सहन होणार नाही. अजिबात पटणार नाही. एकत्र लढायचं असेल तर दैवतांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांना दिला आहे. आता उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावरुन भाजप (BJP)नेते राम कदमांनी (Ram Kadam)ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरेंचं वीर सावरकरप्रेम उफाळून आले आहे. सत्तेच्या काळात राहुल गांधी वीर सावरकरांबद्दल दररोज अपमानास्पद बोलत होते, तरिही आपण शब्द काढला नाही, आपण का शांत राहिले? असा सवालही यावेळी राम कदमांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. त्याचवेळी वीर सावरकरांचा मनीशंकर अय्यरांनी अपमान केल्यानंतर बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray)जसे मनीशंकर अय्यरांच्या (Manishankar Ayyar)फोटोला चपलांनी बडवले तसे उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या फोटोला चपलांनी बडवणार का? असा सवालही यावेळी राम कदमांनी केला आहे.
Gopichand Padalkar : पवार हे महाराष्ट्राला लागलेली कीड; पडळकरांची जहरी टीका
राम कदम म्हणाले की, आपण राज्याचे मुख्यमंत्री असताना राहुल गांधी दररोज वीर सावरकरांविषयी अपशब्द बोलत होते त्यांच्यावर टीका करत होते. त्यावेळी तुम्हाला बोलण्यापासून कोणी अडवलं होते? तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री होतात. आता राहुल गांधी अपमान करत आहेत आणि तुमचं म्हणणं आहे की, सहन करणार नाही, मग बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे जसं मनीशंकर अय्यर यांनी वीर सावरकरांचा अपमान केला, त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी मनीशंकर अय्यरांच्या फोटोला चपलांनी बडवलं होतं. तसं आपण बडवणार आहात का? आपण जे भाषणात बोललात ते फक्त नौटंकी होती का? असा सवालही यावेळी राम कदमांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.
राहुल गांधींचं आम्ही सहन करणार नाही असं म्हणता आणि त्याच राहुल गांधींच्या कॉंग्रेससोबत घरोबा करायचा हा दुटप्पीपणा असल्याची टीका यावेळी कदमांनी केली आहे. वीर सावरकरांविषयी जर खरं प्रेम असेल तर जसे बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःच्या जोड्यांनी मनीशंकर अय्यर यांच्या फोटोला बडवलं तसं आपणही बडवणार आहात का? असा महाराष्ट्राच्या जनतेचा आपल्याला सवाल आहे, अशा प्रकारची जोरदार टीका राम कदमांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.