राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कार्यकर्ते जसे स्तब्ध झाले आहेत तसेच पक्षातील नेतेही स्तब्ध झाले आहेत.
त्यावर अनेक लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र इतर नेत्यांपेक्षा वेगळं मत मांडलं. यावेळी अजित पवार म्हणाले की खरंतर ते कालच राजीनामा देणार होते. पण काल महाविकास आघाडीची सभा होती. मीडियामध्ये तेच येत राहिले असत म्हणून कालच्या ऐवजी आज राजीनामा देण्याचा राजीनामा ठरला. अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
पण य सगळ्या दरम्यान चर्चा झाली अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना केलेल्या सूचनेची. शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या जवळपास सर्व नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वानी आपला राजीनामा मागे घ्यायची विंनती केली. त्यावेळी जेव्हा काही नेत्यांनी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना बोलण्याची विंनती केली तेव्हा आमही घरातून बोलू शकत नाही. असं अजित पवार म्हणाले पण त्यानंतर मात्र अजित पवार यांनी स्वतः मनोगत व्यक्त केलं. पण सुप्रिया सुळे यांना मात्र मोठा भाऊ म्हणून सांगतो. बोलू नको, असं सांगितलं.
त्यामुळे अजित पवार यांच्या या आक्रमक भूमिकेची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अगदी आक्रमक घोषणा देणाऱ्यांना अजित पवारांनी त्यांच्या शैलीत झापले. ये तू गप रे, तुलाच फार कळत का? असे अनेकांना म्हणत होते. ये संजय तू आता बास कर (बहुतेक संजय बनसोडे असावेत). तुम्हाला साहेबांना त्रास द्यायचा आहे, असे अजितदादा सुनावत होते.
सुप्रिया सुळेंकडे पक्ष सोपवण्याचा पवारांचा प्लान? मित्राकडूनच मोठा दावा