Kondhwa Rape Case: ‘डिलिव्हरी बॉयने बलात्कार केला’, असा आरोप करणाऱ्या २२ वर्षीय युवतीच्या तक्रारीमागचं खरं चित्र अवघ्या २४ तासांत समोर आलं होतं. मात्र, तपास जसजसा पुढे जात आहे, ही घटना बनावट असल्याचं आणि सोबतच अनेक धक्कादायक खुलासे पोलीस करत आहेत. उघड झालं असून, संबंधित तरुण ओळखीतलाच मित्र असल्याचं स्पष्ट झालं आहे.
या प्रकरणात युवतीने असा आरोप केला होता की, एक अनोळखी डिलिव्हरी एजंट तिच्या घरात जबरदस्तीने घुसला. त्याने काहीतरी चेहऱ्यावर स्प्रे केलं, ज्यामुळे ती बेशुद्ध झाली. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिच्या मोबाईलमध्ये सेल्फी काढत ‘मी पुन्हा येईन’ अशी धमकी दिली. ही घटना समोर येताच एकच खळबळ उडाली होती.
मात्र, पुणे पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सखोल चौकशीनंतर हा संपूर्ण प्रकार युवतीनेच घडवून आणल्याचं सांगितलं. पोलिस आयुक्तांच्या माहितीनुसार, आरोपी तरुण हा तिचाच मित्र असून, तीनेच त्याला घरी बोलावलं होतं. मोबाईलमधील सेल्फी देखील दोघांच्या संमतीने घेतलेला होता. मात्र, वादानंतर त्याचाच उपयोग तिने ‘दाखवण्याजोग्या’ पुराव्यासारखा केला आणि फोटो एडिट करून ‘धमकी’ असल्याचं भासवलं.
पोलिसांनी दोघांना समोरासमोर बसवून चौकशी केली. त्यावेळी खूपशा गोष्टी स्पष्ट झाल्या. त्यानंतर युवतीला समुपदेशनासाठी पाठवण्यात आलं आहे.
विशेष बाब म्हणजे, या खोट्या तक्रारीत युवतीला एका प्राध्यापक महिला मित्राकडून मदत मिळाल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे. संबंधित प्राध्यापिका खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत असून, तक्रार दाखल करण्यापूर्वी दोघींमध्ये संपर्क झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी त्या प्राध्यापिकेचा जबाब नोंदवला असून, तिने तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया, तपास अधिकारी काय विचारतील यासारख्या गोष्टींचं मार्गदर्शन केल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे.
हे सगळं बलात्काराच्या तक्रारीपर्यंत कसं पोहोचलं…? हे शोधून काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला… आणि डोक्यालाच हात मारायचा तो बाकी राहिला. तर घटनाक्रम असा की, कल्याणीनगरच्या एका आयटी कंपनीत ही पीडित तरुणी काम करते. पुण्याच्या कोंढवा भागात ती तिच्या भावासोबत राहते. बुधवारी म्हणजेच घटनेच्या दिवशी तिचा भाऊ परगावी गेला होता. सायंकाळी सातच्या सुमारास तरुणी एकटीच सदनिकेत होती. साडे पाच वाजता या दोघांचं फोनवर बोलणं झालं होतं. भाऊ घरी नसताना मुलाच्या यायचा प्लॅन बनला… भेटायला म्हणून तो पोहोचला. गंमत म्हणजे… ती घरी एकटी असताना अनेकदा तो आधी असाच गेला आहे.
मग याचा पुरावा काय… तर… या सोसायटीच्या गेटवर असलेले जे सुरक्षा रक्षक आहेत, ते येणाऱ्या व्यक्तीची संपूर्ण माहिती नोंद करत असतात. खरं नाव सांगितलं तर तरुणीच्या घरच्यांनी… गेटवरचे रजिस्टर पाहिलं तर आपण घरी येऊन गेलो हे समजेल असा… त्यांना धोका वाटत होता. त्यामुळे, दोघांनी मिळून शक्कल लढवली. प्रत्येकवेळी मुलगा आपण कुरिअर बॉय असल्याचं गेटवर सांगत असे… त्यानंतर सुरक्षा रक्षक खातरजमा करण्यासाठी मुलीला फोन करत आणि प्रवेश देण्याबाबत विचारणा करत. त्यानंतर ती तरुणी होकार देत असे… दुजोरा द्यायची… आणि मग सुरक्षा रक्षक त्याला प्रवेश द्यायचे. अशा प्रकारे सुरक्षा रक्षकांना तो कुरिअर बॉय असल्याचं हे दोघं मिळून भासवत असत.
आता याप्रमाणे तो तिच्या घरात प्रवेश करतो… तिच्याच संमतीनं… आता पुढे नेमकं काय झालं ते पाहूयात… पोलीस तपासातून जे काही समोर आलं ते… बळजबरी करणारा युवक तरुणीचा बॉयफ्रेंडच होता. शारीरिक संबंध ठेवण्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. मुलानं इच्छा व्यक्त केली. मात्र, तरुणीने मासिक पाळीचं कारण देत संबंध ठेवायला नकार दिला. मात्र, तरुणाला भावना कंट्रोल झाल्या नाहीत… त्यानं त्या परिस्थितीतही संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केली. दोघांमध्ये वाद झाला आणि तरुणीनं थेट डिलिव्हरी बॉयकडून अतिप्रसंग करण्यात आल्याची कथा अशाप्रकारे रंगवली.