पुणे : येथील एका व्यावसायिकाची आसाममधील गुवाहाटी (Guwahati) शहरातील पंचतारांकीत हॉटेलमध्ये हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुवाहाटी पोलिसांनी (Police) तरुणीसह दोघांना अटक केली आहे. संदीप सुरेश कांबळे (44, रा. येरवडा) असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. तर अंजली शॉ आणि विकासकुमार शॉ असे अटक केलेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत. (A businessman from Pune was murdered in a five-star hotel in Guwahati, Assam)
याबाबत अधिक माहिती अशी की, अंजली आणि सुरेश यांची कोलकाता येथील विमानतळावर एकमेकांशी ओळख झाली होती. त्यानंतर ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. ते दोघेही पुणे आणि कोलकता येथे नियमित भेटत असत. मात्र संदीप अंजलीवर लग्नासाठी दबाव आणत होता. पण अंजलीने लग्नाला नकार दिल्यामुळे त्याने दोघांची छायाचित्रे नातेवाईकांना पाठविली.
हा प्रकार वैतागून अंजलीने मित्र विकास कुमार याला सांगितला. यानंतर अंजलीने संदीपला गुवाहाटीमध्ये बोलावून घेतले. शहरातील एका तारांकित हॉटेलमध्ये दोघांचीही भेट झाली. यावेळी अंजलीने संदीपला सोशल मीडियावर अपलोड केलेले फोटो डिलीट करायला सांगितले. परंतु संदीपने त्याला नकार दिला. त्यामुळे चिडून तिने संदीपला मिठाईतून गुंगीचे औषध दिले. तर बेशुद्ध विकासने त्याला जबर मारहाण केली. यात संदीपला जबर जखमा झाल्या.
त्यामुळे घाबरलेल्या दोघांनीही संदीपला खोलीत जखमी अवस्थेत सोडून दोघे पसार झाले. यात संदीपचा मृत्यू झाला. यानंतर गुवाहटी पोलिसांनी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या मदतीने तपास सुरु केला. यावेळी पश्चिम बंगालमधील तरुणीसह तिच्या साथीदाराने संदीपचा खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अंजली आणि विकासकुमार या दोघांना अटक केली.