पुणे : पुणे जिल्हातील माझी ही पहिलीच निवडणूक होती. मी कसबा पेठ पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यात माझा पराभव झाला. मात्र, माझ्या पायगुणामुळेचे काँग्रेसचा उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा विजय झाला आहे, असा दावा कसबा पोटनिवडणुकीत (Kasba Bypoll) अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले (Abhijeet Bichukle) यांनी केला आहे.
कसबा पेठ पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले यांना केवळ ४७ मते मिळाली आहेत. त्यामुळे त्यांचे डिपॉजिट देखील जप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना अभिजित बिचुकले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे केवळ माझ्या पायगुणामुळे निवडून आले आहेत, असा दावा केला आहे.
NCP Win Nagaland Election : नॉर्थ ईस्टमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘शिरकाव’
अभिजित बिचुकले म्हणाले की, मी आता जरी हरलो असलो तरी लढत राहिल. कारण ज्या पक्षाचे १४ आमदार होते. त्यांचा आता एकच आमदार आहे, असे म्हणत राज ठाकरे यांना चिमटा काढला. तर पराभवाने मी खचत नाही तर लढत राहीन. तसेच एक दिवस १५० आमदार घेऊन विधानसभेत जाईन. आणि पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून माझी पत्नी अलंकृता बिचुकले या शपथ घेतील, असा देखील दावा बिचुकले यांनी केला आहे.