ससून रुग्णालयातून आणखी एक आरोपी पळाला; कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला दिली होती धमकी

पुणे : ड्रग तस्कर ललित पाटील (Lalit Patil) पळून गेल्याचे प्रकरण अद्याप शांत झालेले नसतानाच ससून रुग्णालयातून आणखी एका आरोपीने पळ काढला आहे. मार्शल लीलाकर असे या आरोपीचे नाव होते. सोशल माध्यमावरून रील्स आणि कमेंट करून कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याच्या पत्नीला धमकवल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर त्याला […]

Sharad Mohol

Sharad Mohol

पुणे : ड्रग तस्कर ललित पाटील (Lalit Patil) पळून गेल्याचे प्रकरण अद्याप शांत झालेले नसतानाच ससून रुग्णालयातून आणखी एका आरोपीने पळ काढला आहे. मार्शल लीलाकर असे या आरोपीचे नाव होते. सोशल माध्यमावरून रील्स आणि कमेंट करून कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याच्या पत्नीला धमकवल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आज (11 फेब्रुवारी) त्याने रुग्णालयातून पळ काढला आहे. यामुळे रुग्णालय प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. (accused Marshal Leelakar has escaped from Sassoon Hospital.)

Exit mobile version