सिंहगड संस्थेच्या 9 शाळांवर प्रशासकाची नियुक्ती ; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शिक्षण विभागाची कारवाई

Sinhgad Institute : पुण्यातील नामांकित सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या 9 माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचा कारभार आता प्रशासकाच्या

Sinhgad Institute

Sinhgad Institute

Sinhgad Institute : पुण्यातील नामांकित सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या 9 माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचा कारभार आता प्रशासकाच्या हाती गेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नवीन समिती स्थापन करुन प्रशासक नेमण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आणि शिक्षण संचालनालयाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

मंगळवारी याबाबतचे अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. नऊ शाळांचे दैनंदिन कामकाज व व्यवस्थापन पाहण्यासाठी राज्य सरकारने प्रशासक म्हणून डॉ. भाऊसाहेब कारेकर (शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग, पुणे) सल्लागार पदी छाया महिंदकर, उपशिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग, पुणे व विराज खराटे, विज्ञान पर्यवेक्षक पुणे, नियुक्त केलेल्या प्रशासक व सल्लागार समितीने तात्काळ पुढील आवश्यक ती कार्यवाही करून त्याचा सविस्तर अहवाल राज्य सरकार आणि शिक्षण संचालनालयास सादर करावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

प्रशासक नेमण्यात आलेल्या 9 शाळांची यादी

1. सिंहगड स्प्रिंग डेल स्कूल, आंबेगाव
2. सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक स्कूल, वडगाव
3. सिंहगड सिटी स्कूल, कोंढवा
4. सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, नर्हे, जि. पुणे
5. सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, आंबेगाव, जि. पुणे
6. सिंहगड पब्लिक स्कूल, खुसगाव, लोणावळा, जि. पुणे
7. आर.एम.डी. स्प्रिंगडेल माध्यमिक स्कूल, वारजे, जि. पुणे
8. स्प्रिंगडेल माध्यमिक स्कूल, कर्वेनगर, एरंडवणे, जि. पुणे

ऑपरेशन टायगर 3, भास्कर जाधव सोडणार ठाकरेंची साथ? उदय सामंत म्हणाले…

9. सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, कोंढवा, जि. पुणे

Exit mobile version