Download App

Bhima Koregaon Caseची सुनावणी एकाच बाजूने सुरु; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

Prakash Ambedkar On Bhima Koregaon Case : कोविड नसता तर कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची सुनावणी आत्तापर्यंत पूर्ण झाली असती. सध्याची सुनावणी ही एकाच बाजूने सुरु आहे. माझी उलट तपासणी सुरु झाली आहे. या प्रकरणाची जशी हवी तशी तपासणी होत नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला.

…तर मीही उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या प्रेसला जाणार अन् प्रश्न विचारणार

कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणाची आयोगाकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीत पुणे येथील तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. सौरभ राव यांचीही उलट तपासणी घेण्यात आली आहे. आज वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांची उलटतपासणी झाली.

चीनची अर्थव्यवस्था डबघाईला! परदेशी गुंतवणूकदारांनी 188 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक काढली

कोरेगाव भीमा प्रकरणाची सुनावणी 19 ऑक्टोबरला होणार आहे. त्याचवेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महत्वाच्या व्यक्तींची साक्ष झाल्याशिवाय सुनावणी पूर्ण होणार नाही. या सुनावणीमध्ये पूर्वीच्या अनेक गोष्टी नव्याने काढल्या जात आहेत.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, कोरेगाव भीमा प्रकरणाची सुनावणी ही काही गोष्टींसाठी वापरली जात असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे आयोग असहाय आहे. आज माझी उलटतपासणी झाली, ती एक उलटतपासणी संभाजी महाराजांची समाधी त्याची देखभाल करणं, ती मान्यता कोणाला दिलेली आहे? ती शेवाळेंना दिलेली आहे की, गोपाल यांना दिलेली आहे? अशावरच असलेले प्रश्न विचारले.

दुसरे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या बाजूने होते. आणि भारत पाटणकर यांचं जे मध्यंतरी एक वक्तव्य होतं, त्या माध्यमातून मिलींद एकबोटे आणि संभाजी भिडे हे दोघेही नाहीत, अशी परिस्थिती आहे.

Tags

follow us