Angry Husband Burned Many Vehicles In Kondhawa : पती-पत्नीच्या वाद आपण अनेकदा ऐकले किंवा पाहिले असतील. मात्र, पुण्यात एक वेगळाचं प्रकार समोर आला आहे. पत्नीनं घटस्फोटाची नोटीस पाठवताच राग अनावर झालेल्या पतीनं गाड्या जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडली आहे.
भूषण देसाई यांना शिवसेनेत घेताच भाजपचा एकनाथ शिंदेंना इशारा..
जॉन असं गाड्यांची जाळपोळ केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. लग्नानंतर आपला नवरा कोणत्याही प्रकारचे काम करत नव्हता. त्यामुळे जॉन याच्या पत्नीनं जॉनला घटस्फोटाची नोटीस धाडली होती. आपल्याला घटस्फोट देऊ नको अशी विनवणी जॉननं केली होती. मात्र, त्यानंतरही त्याच्या पत्नीनं घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. हाच राग अनावर झाल्याने रागाचा भरात जॉननं परिसराती 10 ते 15 गाड्यांवर पेट्रोल टाकून त्या जाळून टाकल्या. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
याप्रकरणी पोलिसांनी जॉनला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर पुढील कारवाई केली जात आहे. यापूर्वी परिसरात दहशत माजवण्यासाठी गाड्यांची जाळपोळ केल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. मात्र, पती पत्नीच्या भांडणात अशा प्रकारे गाड्या जाळण्याची ही पुण्यातील पहिलीच घटना आहे. या घटनेनंतर परिसरात कुणाचा राग कुणावर अशी चर्चा रंगली असून, यामध्ये गाडी चालकांचे मात्र मोठं नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, टेरेन्स जॉनच्या पत्नीचे पोलिसांत जॉनच्या विरोधित तक्रार दाखल करत घटस्फोटासाठी अर्ज दिला होता. घटस्फोटाच्या अर्जावरून चिडलेल्या जॉनने पत्नीच्या दुचाकी सह परिसरातील चारचाकी कार रिक्षा आणि इतर वाहन पेट्रोल टाकून पेटवून जाळल्याच्या धक्कादायक घटनेने कोंढव्यात खळबळ उडाली आहे. आरोपी टेरेन्स आणि त्याची पत्नी एलिना जेकेब यांचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर आरोपी कोणतेही काम धंदा करत नव्हता म्हणून पत्नीने त्याच्या विरोधात पोलिसांमार्फत घटस्फोटासाठी अर्ज दिला होता. आपल्याला घटस्फोट देऊ नको अशी विनंत वेळोवेळी जॉनकडून पत्नीकडे करण्यात येत होती. मात्र, त्यानंतरही जॉनच्या पत्नीनं घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.
आपण विनंती करूनही पत्नीनं घटस्फोटाची नोटीस पाठवल्याने जॉनला राग अनावर झाला. याच रागाच्याभरात जॉननं पत्नीच्या दुचाकीसह परिसरात गाड्यांवर पेट्रोल ओततं त्या पेटवून दिल्या. यात परिसरातील चारचाकी, रिक्षा आणि दुचाकींचा समावेश आहे. आरोपीने थेट पत्नीच्या गाडीसह परिसरातील वाहनेच पेटवून दिल्याने शहरात खळबळ उडाली आहे.