पुणे : पुणे विमानतळावर 180 प्रवाशांसह खचाखच भरलेलं विमान धावपट्टीवर टग ट्रॅक्टरला धडकल्याचे समोर आले आहे. या घटनेत विमानाचे नुकसान झाले असून, सर्व प्रवाशी सुखरूप असल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा अपघात काल (दि.16) रोजी घडला. अपघातग्रस्त विमान एअर इंडिया (Air India) कंपनीचे होते. जे पुण्याहून दिल्लीकडे जाणार होते. (Air India Flight Collides With Tug Tractor At Pune Airport Runway)
Pune News : दुबईच्या प्रवाशाने अंडरवेअरमध्ये लपवली सोन्याची पावडर पण विमानतळावर..,
घटनेच्या चौकशीचे आदेश
पुणे विमानतळावर (Pune Airport) घडलेल्या या घटनेची चौकशी करण्याचे आदेश नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) दिले असून, प्राथमिक माहितीनुसार टग ट्कॅक्टरची विमानाला धडक बसल्याचे सांगितले जात आहे. “पुशबॅकवेळी एअर इंडियाच्या विमानाला ही धडक बसल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. हे विमान पुणे ते दिल्ली असे उड्डाण घेणार होते. मात्र, अपघातानंतर विमाानातील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले आणि विमान तपासणीसाठी नेण्यात आल्याने उड्डाण रद्द करण्यात आले.
https://x.com/ANI/status/1791336898717450577
प्रवाशांना प्रवास भाडे दिले
घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले होते. परंतु, संबंधित विमानातील सर्व प्रवाशांना त्यांच्या प्रवासी भाड्याची पूर्ण रक्कम परत करण्यात आली आहे. याशिवाय विनामुल्य प्रवास करण्याचीही सोय करण्यात आल्याचे एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
Pune : माझ्या संपूर्ण शरीरावर बॉम्ब वृद्ध महिलेच्या दाव्याने पुणे विमानतळावर खळबळ
अपघात कसा झाला?
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे फ्लाइट क्रमांक AI 858 गुरुवारी (दि.16) दुपारी 4:10 वाजता पुणे विमानतळावरून दिल्लीसाठी रवाना होणार असल्याने सर्व प्रवासी विमानात बसले होते. त्यावेळी टॅक्सी ट्रॅकवरून धावपट्टीच्या दिशेने जाण्यापूर्वी विमानाला ‘पुश बॅक टग’ने धडक दिली. यात विमानाच्या समोरील बाजूचे तसेच गिअरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे संबंधि विमानाचे सुरक्षेच्या कारणास्तव उड्डाण रद्द करण्यात आले. हा अपघात ऑपरेटरचे पुश बॅक टगवरील नियंत्रण सुटल्याने झाल्याचे सांगितले जात आहे.