मुंबई : पुण्याहून मुंबईकडे जायचं म्हंटले की तीन ते चार तासांचा अवधी लागत असत. मात्र आता प्रवाश्यांसाठी खुशखबर आहे. कारण आता तुम्ही हा प्रवास केवळ तासाभरात करू शकणार आहे. हे ऐकून तुम्हाला विश्वास बसत नसेल मात्र हे खरं आहे. कारण टाटा समूहाच्या मालकीची एअर इंडियाकडून येत्या 26 मार्चपासून मुंबई-पुणे, पुणे-मुंबई अशी विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. सदर विमानसेवा ही 26 मार्चपासून सुरु होणार असल्याने याचा मोठा फायदा प्रवाश्यांना होणार आहे. यामुळे प्रवाश्यांचा वेळ देखील वाचणार आहे.
प्रवाश्यांकडून गेल्या अनेक दिवसांपासून पुणे ते मुंबई विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली जात होती. अखेर थेट पुणे-मुंबई ही विमानसेवा 26 मार्चपासून सुरू होत आहे. विशेष बाब म्हणजे पुणे – मुंबई प्रवासासाठी तिकिटांची देखील नोंदणी सुरू झाली आहे.
चार तासांचा प्रवास तासाभरात होणार शक्य
पुणे आणि मुंबई यांना जोडणारा द्रुतगती मार्ग असून, दोन्ही शहरांतील अंतर 150 किलोमीटर आहे. हे अंतर रस्त्याने अथवा रेल्वेने तास ते चार तासांचे असायचं. मात्र आता हेच अंतर विमानसेवेमुळे एका तासात पार करणे शक्य होणार आहे. याआधी पुणे-मुंबई ही थेट विमानसेवा जेट एअरवेजकडून सुरू होती, परंतु ती बंद करण्यात आली.ती बंद झाल्यानंतर पुणे-मुंबई थेट विमानसेवा नव्हती. मात्र आता प्रवाश्यांची होणारी गैरसोय आता लवकरच दूर होणार आहे. कारण आता 26 मार्चपासून ही विमानसेवा पुन्हा एकदा सुरु होणार आहे.
महिला आमदारांची विधानभवनात जोशात एंट्री..
पुणे ते मुंबई हा प्रवास विमानातून एका तासात होणार असला तरी विमानतळापर्यंत पोहोचणे आणि सुरक्षा तपासणी यात वेळ जाणार आहे. दोन्ही विमानतळे शहरांच्या मध्यवर्ती भागापासून काही अंतरावर असल्याने तेथून वाहतूक कोंडीतून प्रवाशांना मार्ग काढावा लागणार आहे. एकीकडे हे असलं तर दुसरीकडे मात्र एअर इंडियाने ही सेवा सुरू केल्याने पुणेकरांचा वेळ वाचणार असून फायदाही होणार आहे.
शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता होईल दूर, हे आरोग्यदायी ज्यूस नक्की घ्या
वेळ
पुणे-मुंबई : सुटण्याची वेळ: सकाळी 11:20 आणि आगमनाची वेळ: दुपारी 12:20
तिकीट दर : इकॉनॉमी: 2,237 रुपये आणि बिझनेस क्लास: 18,467 रुपये