Download App

Maharashtra Politics : चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीसाठी Ajit Pawar आणि पंकजा मुंडे आज आमने- सामने

पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीसाठी (By elections) आज प्रचार सभेचा धडाका सुरु झाला आहे, भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांच्यासाठी भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची आज सभा होणार आहे, तर राष्ट्रवादीच्या नाना काटे (Nana Kate) याच्यासाठी विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) देखील मैदानात उतरले आहेत, अजित पवार यांची देखील आज सायंकाळी ७ वाजता चिंचवडमध्ये सभा होणार आहे.

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी (Kasba Peth Election) या दोन दिग्ग्ज नेत्यांची सभा होत आहे, महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत जी आहे, ती चिंचवड निवडणुकीमध्ये पोटनिवडणुकीमध्ये पाहायला मिळत आहे, मात्र कोणत्याही परिस्थिती मध्ये चिंचवडची जागा आपल्या ताब्यामध्ये ठेवण्यासाठी दोन्ही पक्षाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत, भाजपकडून दिग्ग्ज नेते जे आहेत, ते चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये प्रयत्न करताना ते दिसत आहेत, पंकजा मुंडे यांची जाहीर सभा जी आहे, ती सुद्धा पार पडणार आहे, पंकजा मुंडे यांच्या मतदार संघामध्ये प्रचार दौरा असणार आहे, यानिमित्त भाजप जे आहे, शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे.

मध्यंतरी चर्चा होती की, पंकजा मुंडे भाजपवर नाराज आहेत, मात्र त्यांनी माध्यमांसमोर स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली आणि आज प्रचारामध्ये सुद्धा ते आज सहभाग होत आहेत, भाजपचे उमेदवार असलेल्या अश्विनी जगताप याच्या प्रचारार्थ ते जाहीर सभा घेणार आहेत, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी म्हणून अजित पवार जे आहेत, ते चिंचवड पोटनिवणुकीवर आधी पासूनच लक्ष ठेवून आहेत, पूर्ण सूत्र अजित पवारांनी हातात घेतली आहेत, आणि अजित पवारांची सुद्धा आज सायंकाळी ७ वाजता जाहीर सभा पार पडणार आहे.

यावर काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

पंकजा मुंडे यांनी आज महाशिवरात्रीनिमित्त बीडमध्ये वैद्यनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी त्यांना निवडणूक आयोगाच्या निकालाबाबत विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना त्यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. आज महाशिवरात्री आहे. त्यामुळे मी राजकीय प्रतिक्रिया देणार नाही. मात्र, ज्यांना चिन्ह मिळालं आणि ज्यांना नाही मिळालं, अशा दोघांनीही या निर्णयाला पुढे नेण्यासाठी ईश्वर शक्ती देवो”, असे त्या म्हणाल्या.

पुढे बोलताना त्यांनी अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्याविषयी प्रतिक्रिया दिली. अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून मी यावेळी उपस्थित राहणार असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच आज कसबापेठ आणि पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी पुण्याच्या दिशेने रवाना होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

follow us