Download App

Ajit Pawar भडकले… तुम्ही मला काय मुर्ख समजता का?

मुंबई : चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी (Chinchwad) राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार असणार याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारले असता ते पत्रकारांवर भडकले. पवारांनी पत्रकारांवर संताप व्यक्त करत “मला मूर्ख समजू नका, मी उद्याच उमेदवाराचे नाव सांगेन”, असं पवार म्हणाले.

सध्या राज्यात कसबा व चिंचवड निवडणूक मुद्दा चांगलाच गाजत आहे. यातच निवडणुका म्हंटल्या तर त्या बिनविरोध होण्याचा संबंध येत नाही असं म्हणत अजित पवार यांनी निवडणुका होणारच हे स्पष्ट केलं होत. मात्र चिंचवड विधानसभा निवडणुकीसाठी आपला कोण उमेदवार असणार यावर पवारांनी बोलण्यास नकार दिला.

निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी आपला उमेदवार उतरवणार मात्र तो आयात असेल का असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला होता. याच प्रश्नावर पवार भडकले, ‘तुम्ही काय मला मुर्ख समजता का? आयात होईल का, फलानं होईल का? मला जे नाव सांगायचे आहे, ते आम्ही उद्याकडे सांगणार आहोत, असं उत्तर देऊन अजित पवार यांनी पुढे बोलण्याचं टाळलं.

आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे मात्र राष्ट्रवादीने अद्यापही त्यांचा उमेदवार जाहीर केला नाही आहे. मात्र ठाकरे गटाचे पदाधिकारी राहुल कलाटे यांचं नाव महाविकास आघाडीतर्फे चर्चेत होतं. त्यानुसार राष्ट्रवादीकडून कलाटे यांनाच प्रवेश देऊन निवडणूक लढवण्या शिवाय राष्ट्रवादीकडे पर्याय नसल्याने आयात उमेदवारा मार्फत ही निवडणूक लढवली जाणार का असा पत्रकारांच्या प्रश्नाचा रोख होता.

दरम्यान, एकीकडे हे सगळं सुरू असलं तरी दुसरीकडे मात्र ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप व शिंदे गटाकडून आवाहन केले जात आहे. बिनविरोधसाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पक्षांना आवाहन केले आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील इतर पक्षांना विनंती केली आहे.

अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध झाली असली तरी पंढरपूर, कोल्हापूर आणि देगलूरची पोटनिवडणूक बिनविरोध झाली नाही, याची आठवण अजित पवार यांनी करून दिली. चिंचवडची पोटनिवडणूक घड्याळाच्या चिन्हावर लढवली जाईल, असं पवार म्हणाले.

follow us