पुणे : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून (Shiv Sena) उठाव केल्यावर पक्षात मोठी फूट पडली. शिवसेनेचं शिंदे गट (Shinde group) आणि ठाकरे गट अशा दोन गटात विभाजन झालं. शिवसेनेतील अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठा गौप्यस्फोट केला. या गौप्यस्फोटानं परत एकदा राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आले.
शिवसेनेत जी फूट पडली, ती फूट पडण्याअगोदरच या सर्व गोष्टींची माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यात आली होती. पण, स्वत: पवारसाहेबांनी उद्धव ठाकरे यांच्या कानावर या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या. पण उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांवर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि तिथेच खरी गफलत झाल्याचं गौप्यस्फोट अजित पवार यांनी केले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की मी स्वत: याविषयी उद्धव ठाकरे यांना सावध केलं होतं. पण त्यावेळी ते बोलले की, हा आमचा पक्षांतर्गत विषय आहे. मी बोलेल एकनाथ शिंदे यांच्याशी असं उत्तर त्यांनी दिलं, आणि शेवटी जे नको व्हायला पाहिजे होतं तेच झालं. शिवसेनेमध्ये मोठी फूट पडल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.