Ajit Pawar : गद्दारांना शिक्षक, पदवीधरांनी धडा शिकवला!

पुणे : राज्यात जून-जुलै महिन्यामध्ये गद्दारी करून सत्तेत आलेल्या भाजप (BJP) आणि शिंदे गटाला (Shinde Group) शिक्षक आणि पदवीधरांनी चांगलाच धडा शिकवला आहे. अशा प्रकारची गद्दारी या महाराष्ट्राला परवडणारी नाही. कारण अस्थिर सरकारमुळे राज्याचा विकास थांबतो. अधिकारी काम करत नाहीत. कारण गद्दारी करून सत्तेत आलेलं सरकार केव्हाही पडू शकते अशी धास्ती अधिकाऱ्यांना असते. मात्र, त्यामुळे […]

ajit pawar_LetsUpp

ajit pawar_LetsUpp

पुणे : राज्यात जून-जुलै महिन्यामध्ये गद्दारी करून सत्तेत आलेल्या भाजप (BJP) आणि शिंदे गटाला (Shinde Group) शिक्षक आणि पदवीधरांनी चांगलाच धडा शिकवला आहे. अशा प्रकारची गद्दारी या महाराष्ट्राला परवडणारी नाही. कारण अस्थिर सरकारमुळे राज्याचा विकास थांबतो. अधिकारी काम करत नाहीत. कारण गद्दारी करून सत्तेत आलेलं सरकार केव्हाही पडू शकते अशी धास्ती अधिकाऱ्यांना असते. मात्र, त्यामुळे सर्वसामान्य लोकांची कामे रखडली जातात. त्यामुळेच शिक्षक आणि पदवीधर युवकांनी भाजप-शिंदे गटाला चांगलाच धडा शिकवला आहे. अशाच प्रकारे पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad Bypoll) या दोन्ही पोटनिवडणुकीत धडा शिकवायचा आहे, अशा तीव्र शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेता अजित पवार (Ajit Pawar) यांनी टीका केली.

कसबा पेठ मतदार संघ पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचार सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नका. कसबा पेठ मतदार संघ स्वतःची जहागिरी समजणाऱ्यांना धडा शिकवून आपल्याला इतिहास घडवायचा आहे. भाजप महागाईतून सर्वसामान्य लोकांची कशी लूट करत आहे. देशात बेरोजगारी कशी वाढत आहे, हे मुद्दे आपल्याला मतदारांपर्यंत घेऊन जायचे आहेत.

Exit mobile version