Ajit Pawar : मुलींना त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई करा

Ajit Pawar :  बारामतीमध्ये अजित पवार यांच्या घराच्या जवळ एका तरुणाने युवती वरती विनयभंग केल्याची घटना आज घडली. या घटनेबाबत बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुलींना त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. तसेच यावेळी पवारांनी पालकांना आपल्या पाल्यांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन देखील केले. या घटनेबाबत अतिरिक्त पोलिस अधीक्षक व उपविभागीय […]

Ajit Pawar

Ajit Pawar :  बारामतीमध्ये अजित पवार यांच्या घराच्या जवळ एका तरुणाने युवती वरती विनयभंग केल्याची घटना आज घडली. या घटनेबाबत बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुलींना त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. तसेच यावेळी पवारांनी पालकांना आपल्या पाल्यांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन देखील केले.

या घटनेबाबत अतिरिक्त पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांशी अजित पवार यांचे बोलणे झाले, तसेच ही घटना अतिशय गंभीर असल्याचे यावेळी पवारांनी सांगितले कारण भर दिवस लोकवस्तीमध्ये एखाद्या मुलीचा विनयभंग होत असेल तर ही खूप लाजिरवाणी आहे त्यामुळे पोलिसांनी लवकरत लवकर या घटनेतील आरोपीवर कारवाई करावी अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत.

काय आहे घटना…

बारामतीतील अजित पवारांचे निवासस्थाना जवळ तरुणीला मारहाणकरून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली . बारामती शहरातील सहयोग सोसायटी येथे तरुणी मेहंदी काढण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी अरफाज सादिक आत्तार याने तरुणीचा विनयभंग केला आहे. तसेच तिला फरफटत घराबाहेर नेऊन तिला जखमी केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. बारामती शहर पोलिसांनी भा.द.वि. 354, 354D, 323, 363, 504, 506 गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास बारामती पोलिस करत आहे.

Exit mobile version