Ajit Pawar : पिंपरी महापालिकेत पाच वर्षात मोठा भ्रष्टाचार!

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) गेल्या पाच वर्षात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. कोणी खमक्या नेता येथे लक्ष द्यायला नव्हता. त्यामुळे प्रत्येक जण त्याला हवे तसे महापालिकेला लुटत, ओरबडत होता. हे प्रसार माध्यमांनी वारंवार छापले आहे. दाखवले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडचे खूप मोठे नुकसान झाले आहे, असा भाजपवर आरोप करत राज्याचे विरोधी पक्षनेता अजित पवार […]

ajit pawar_LetsUpp

ajit pawar_LetsUpp

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) गेल्या पाच वर्षात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. कोणी खमक्या नेता येथे लक्ष द्यायला नव्हता. त्यामुळे प्रत्येक जण त्याला हवे तसे महापालिकेला लुटत, ओरबडत होता. हे प्रसार माध्यमांनी वारंवार छापले आहे. दाखवले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडचे खूप मोठे नुकसान झाले आहे, असा भाजपवर आरोप करत राज्याचे विरोधी पक्षनेता अजित पवार (Ajit Pawar) यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेला ओरबडणाऱ्याना चिंचवड पोटनिवडणुकीत (Chinchwad Bypoll) मतदारांनी जागरूक होऊन मतदान करावे आणि धडा शिकवावा, असे आवाहन केले.

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचार सभेनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यावेळी अजित पवार यांनी भाजपवर टीका केली.

अजित पवार म्हणाले की, कारण नसताना काही जण अफ़वा पसरवत आहे. राहुल कलाटे यांना उमेदवारी मागे घ्यावी म्हणून विनंती केली होती. पण घेतली नाही. ठिक आहे आता चित्र स्पष्ट झाले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेला ओरबडणाऱ्याना चिंचवड पोटनिवडणुकीत मतदारांनी जागरूक होऊन मतदान करावे आणि धडा शिकवावा.

नाना पटोले म्हणाले की, सत्तेचा दुरुपयोग कसा करायचा हे भाजपकडून शिकावं. भाजपने जी आश्वासन दिली. त्याउलट चित्र दिसत आहे. अनिल देशमुखांची राजकीय कारकीर्द संपवण्याचे काम भाजपने केले. अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे परंमवीर सिंग यांचे शंभर कोटी रुपये हे कुठे गेले. याचा जाब आम्ही येणाऱ्या अधिवेशनात विचारणार आहे.

Exit mobile version