Video : अनेकांना अंगावर घेतोय, त्यामुळे घरच्यांना काळजी पण, भितीपोटी थांबले तर, ते पवार कसले

Rohit Pawar दादा गेले त्याचं काही नाही. पण पैसा वाचला पाहिजे. मैत्री टिकली पाहिजे म्हणून व्हिएसआर या कंपनीला मदत केली जात आहे.

Video : जवळच्या लोकांना माझी काळजी पण, भिती पोटी थांबलो तर, मराठी अन् पवार कसले

Video : जवळच्या लोकांना माझी काळजी पण, भिती पोटी थांबलो तर, मराठी अन् पवार कसले

Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash Investigation : मला भीती वाटत नाही पण, माझ्या परिवाला शंभर टक्के भिती वाटत आहे. एवढ्या लोकांना जर तू अंगावर घेत असशील तर, आम्हाला तुझी काळजी वाटते  हे मला माझी पत्नी, मुलांसह आई- सासरे आणि जवळच्या लोकांनी बोलून दाखवलं आहे.  पण आपण नाही लढणार तर कोण लढणार? कारण हा विषय महाराष्ट्रासाठी आणि आमच्या परिवारासाठी अतिशय भावनिक आहे. जर भीती पोटी आम्ही थांबलो तर, आम्ही मराठी माणसं कसले आणि आम्ही पवार कसले असे उत्तर रोहित पवारांनी दिली. ते मुंबईतील वाय बी. चव्हाण सभागृहात पत्रकार परिषद बोलत होते.

अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच अधिकृत स्पष्टीकरण; वाचा नेमका उल्लेख काय?

मलाही कल्पना रिस्क आहे…

अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर रोहित पवारांनी आज (दि.18) मुंबईत पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी अपघाताच्या चौकशीत सर्व केंद्रीय यंत्रणा असताना आणि तुमची ईडीची चौकशी सुरू असताना याची भीती वाटत नाही का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रोहित पवारांनी उत्तर देत कुटुंबातील सदस्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे त्यावर भाष्य केले.

मलाही यात रिस्क आहे ठाऊक आहे. परंतु कितीही रिस्क असली तरी कुणाला तरी यासाठी लढावे लागेल. मी लढतोय. त्यामुळे कुटुंब भावनिकदृष्ट्या खचले आहे. जोपर्यंत अजितदादांच्या अपघाताचा विषय मी तडीस नेत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही. जी काही रिस्क असेल ते माझे कार्यकर्ते, माझी खासगी सुरक्षा व्यवस्था लक्ष देत आहे. माहिती कुठे लपवली आहे ते माझ्या घरी, कार्यालयात नसते. ती कुठे लपवलेली असते ते माझ्या जवळच्यांनाही माहिती नसते. त्यामुळे आम्ही हिंमतीने लढा देतोय. अजितदादांचा घात की अपघात याचा निष्कर्ष येईपर्यंत आम्ही लढत राहू असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

राज्यसभेच्या 7 जागांसाठी बिगुलं वाजलं! 16 मार्चला मतदान; पार्थ पवारांना संधी मिळण्याची शक्यता?

…तर अजितदादांनी आतापर्यंत व्हिएसआर बंद केली असती

सत्तेतील काही लोक व्हीएसआर कंपनीला वाचवायचा प्रयत्न करत असल्याचा दावाही रोहित पवारांनी केला. दादा गेले त्याचं काही नाही. पण पैसा वाचला पाहिजे. मैत्री टिकली पाहिजे म्हणून या कंपनीला मदत केली जात असल्याचे ते म्हणाले.  या कंपनीला आज ना उद्या बंदी घातली पाहिजे असंही रोहित पवार म्हणाले. यावेळी खरंच तुमच्याकडे सत्ता आहे ना, त्या सत्तेचा वापर करून व्हीएसआरला आत्ताच्या आत्ता कुलूप लावण्याची धमक दाखवा असं थेट चॅलेंजही रोहित पवार यावेळी सत्ताधाऱ्यांन दिलं. Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash Investigation

अपघात की कटकारस्थान?; परदेशी पायलटवर प्रश्न; व्हीएसआरच्या कामकाजावर रोहित पवारांचा इशारा

आज अजितदादा असते आणि त्यांच्या कुटु्ंबात, राष्ट्रवादी परिवारत जर अशी घटना घडली असती तर, दादा थेट म्हणाले असते की, राजकारण बाजूला, आत्ताच्या आत्ता व्हीएसआर बंद करा, ही दादांची धमक होती. ही धमक मात्र आज सत्तेत असलेल्या लोकांकडून दिसावी अशी लोकांची आणि आमची अपेक्षा आहे, असे रोहित पवार म्हणाले. माझी पार्थ आणि जय पवारसोबत चर्चा झाली आता त्यांनासुद्धा अपघाताबाबत शंका उपस्थित होत असल्याचे रोहित पवारांनी यावेळी सांगितले. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी सुनेत्रा पवारांकडे सूत्र देण्यात यावी म्हणून सही केली नव्हती तर, केवळ ३५ आमदारांनीच सही केली होती.. त्यातल्या एका जरी आमदाराला विचारलं तर कळेल.. सर्वच पदाधिकाऱ्यांनी सुद्धा सही केली नव्हती.

 

 

Exit mobile version