Ajit Pawar : राहुल कलाटेंच्या बंडखोरीमागचा मास्टरमाईंड वेगळाच… त्यांना फक्त ५०० मतं पडणार!

पिंपरी : आमदारांचे आजारपणापेक्षा भाजपला मतं महत्वाची होती. आजारपणातही लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap), मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांना रुग्णावाहिकेतून मतदानासाठी आणले. मात्र, तिकीट वाटपावेळी यांना टिळकांचे कुटुंब दिसले नाही. राहुल कलाटे (Rahul Kalate) यांना सांगूनही ऐकले नाही. कलाटे यांच्या बंडखोरीमागचा मास्टरमाईंड वेगळाच आहे, ते मला माहिती आहे. पण तूर्तास इतकेच सांगतो की बेडकाचं फुगेलपणा काही […]

Ajit Pawar Rahul Kalate

Ajit Pawar Rahul Kalate

पिंपरी : आमदारांचे आजारपणापेक्षा भाजपला मतं महत्वाची होती. आजारपणातही लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap), मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांना रुग्णावाहिकेतून मतदानासाठी आणले. मात्र, तिकीट वाटपावेळी यांना टिळकांचे कुटुंब दिसले नाही. राहुल कलाटे (Rahul Kalate) यांना सांगूनही ऐकले नाही. कलाटे यांच्या बंडखोरीमागचा मास्टरमाईंड वेगळाच आहे, ते मला माहिती आहे. पण तूर्तास इतकेच सांगतो की बेडकाचं फुगेलपणा काही कामाचा नसतो. त्यांना केवळ ५०० मतं पडणार आहे, असा टोला राहुल कलाटे यांना राज्याचे विरोधी पक्षनेता अजित पवार (Rahul Kalate) यांनी लगावला.

चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचार सभेत अजित पवार बोलत होते. अजित पवार म्हणाले की, आता कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून द्यायची चांगली संधी आली आहे. राहुल कलाटे यांना मी बऱ्याच वेळ समजून सांगितले. पण ऐकलं नाही. ठिक आहे. चिंचवडची जनता त्यांना जागा दाखवून देईल. शिवसेनेची सर्व मतं ही नाना काटे यांनाच पडणार आहे. तर राहुल कलाटे केवळ ५०० मते पडणार आहे. तसेच खरी शिवसेना कोणाची आहे हे देखील समजणार आहे.

Exit mobile version