Download App

Ajit Pawar यांनी घेतली ‘त्या’ सरपंचाच्या कुटुंबियांची भेट!

Ajit Pawar : शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांची दोन दिवसांपूर्वी अतिशय क्रूरपणे खून करण्यात आला. त्यांच्या कुटुंबियांची राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भेट घेत सांत्वन केले. प्रवीण गोपाळे यांची पत्नी, भाऊ यांनी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. ती मी राजकीय दबावाला बळी न पडता पिंपरी-चिंचवडचे सहायक पोलीस आयुक्तांना कारवाई करायला सांगितली आहे, असे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.

पुण्यातील शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांच्यावर अतिशय क्रूरपणे वार करण्यात आली. त्यात त्यांचे दुःखद निधन झाले. तेव्हा मी लगेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून योग्य तपास करत दोषींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तसेच कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता पोलिसांना आपले कर्तव्य करण्याच्या सूचना केल्या आहेत.

Uddhav Thackeray वैफल्यग्रस्त : आम्हीही त्यांना उद्धट, उद्धवस्त ठाकरे म्हणू शकतो… – Letsupp

अजित पवार म्हणाले की, गेल्या काही वर्षांत शहरं वाढत आहे. त्यातून या शहराच्या आजूबाजूची गावं बदलत आहे. जमिनीला प्रचंड भाव आल्याने त्या गावातील सरपंच पदासाठी अनेक जण डोळे लावून बसले आहेत. प्रवीण गोपाळे याचे काम चांगले असल्याने गावाने त्याला बिनविरोध सरपंच केले होते. परंतु, इतर काही प्रतिस्पर्धी लोकांना हे पाहावले नाही. त्यातून प्रवीण याचा अत्यंत क्रूरपणे खून केला आहे. खून करताना कोयत्याचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात कोयता गॅंगबद्दल मी विधानसभेत देखील आवाज उठवला होता. त्याबाबत मी पुन्हा कोयत्या संदर्भात सभागृहात बोलणार आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

follow us