Pune : मुक्तांगण शाळेत चिमुरड्यांचे लैंगिक शोषण; मनसे कार्यकर्त्यांनी आणला प्रकार उघडकीस

पुणे : पर्वती भागातील मुक्तांगण (Muktangan School) शाळेतून धक्कादायक प्रकार समोर येत आहे. शाळेतील 7-8 मुलांचे लैगिक शोषण त्याच शाळेतील मुलांनी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मनसे कार्यकर्त्यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं आहे. या प्रकारानंतर पालकांशी शाळेच्या आवारात गर्दी केली तसंच काही वेळ शाळाही बंद पाडली. याबाबत पोलिसांनी पुढील कार्यवाही करून गुन्हा नोंद करण्याचे आश्वासन […]

Muktangan

Muktangan

पुणे : पर्वती भागातील मुक्तांगण (Muktangan School) शाळेतून धक्कादायक प्रकार समोर येत आहे. शाळेतील 7-8 मुलांचे लैगिक शोषण त्याच शाळेतील मुलांनी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मनसे कार्यकर्त्यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं आहे. या प्रकारानंतर पालकांशी शाळेच्या आवारात गर्दी केली तसंच काही वेळ शाळाही बंद पाडली. याबाबत पोलिसांनी पुढील कार्यवाही करून गुन्हा नोंद करण्याचे आश्वासन संतप्त पालकांना दिले आहे. (Allegation of sexual abuse of 7-8 students of the school by older boys)

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील पहिली ते चौथीत शिकणाऱ्या काही मुलांचे आणि मुलींचे दहावी, बारावीच्या मुलांकडून लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप पालक आणि मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. या मुलांना आणि मुलींना दहावी आणि बारावीचे विद्यार्थी बॅड टच केला जात असल्याचा आरोपही केला जात आहे. या प्रकारावेळी परिसरातील वातावरण तणावग्रस्त बनले होते. पर्वती पोलीस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version