Download App

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार एकमेव चांगले नेते, अमृता फडणवीसांकडून प्रशंसा

  • Written By: Last Updated:

पुणेः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमेव चांगले काम करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे नेते आहेत. अजित पवार हे आमच्यासोबत असल्याचा आनंद आहे, असा तोंडभरून कौतुक अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी केले आहे. अमृता फडणवीस या गणेशोत्सवानिमित्त सोमवारी पुण्यात होत्या. यावेळी त्यांनी काही राजकीय भाष्य केले आहेत. तसेच नागपूरमधील (Nagpur Flood) पूर परिस्थितीबाबत बोलताना पूर परिस्थितीसाठी महानगरपालिका सज्ज नव्हती, अशी कबुली अमृता फडणवीसांनी दिली आहे.

दादांना जयंत पाटलांच्या शुभेच्छा! अजितदादा गटाच्या आमदाराचा खळबळजनक दावा…

देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील का ? यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, भाजप क्रमांक एकचा पक्ष बनावा ही इच्छा आहे. भाजपच्या यशात देवेंद्र यांना स्थान मिळावे. त्यांनी पक्षासाठी सर्वस्व द्यावे. कोणत्याही पदाबाबतच्या मी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी विचार केलेला नाही. ते कार्यकर्ते, नगरसेवक सुध्दा होते. त्यांना जे जमते, त्या स्थानावरून निटपणे काम करावे. पुढे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, नाही होतील हे परिस्थितीनुसार आहे. देवेंद्र हे कोणत्याही स्थानावर असले तरी त्यांनी सर्वस्व द्यावे, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

‘बॅनर लावून मंत्री अन् मुख्यमंत्री होत नाही’; अनिल पाटलांनी बॅनरबाजीवरुन रोहित पवारांना घेरलं…

विरोधात बातम्या येऊ नये म्हणून पत्रकारांना चहा पाजावा, धाब्यावर न्यावे, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. त्यावरून बावनकुळे यांच्यावर चौफेर टीका होत आहे. पण अमृता फडणवीस यांनी बावनकुळे यांची बाजू घेतली आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे पक्षाचे सच्चे कार्यकर्ते आहेत. ते संघटनेसाठी चांगले काम करत आहेत. ते काय बोलले आहेत, याबाबत मला माहिती नाही, असे अमृता फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

नागपूरमधील पूर परिस्थितीवर बोलताना अमृता फडणवीस यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे बोट दाखविले आहेत. अमृता फडणवीस म्हणाल्या, सहा महिन्याचा पाऊस एका दिवशी पडला आहे. नागपूरात ढगफुटी झाली आहे. नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने त्यांनी रोष व्यक्त केला आहे. आता प्रशासन पुन्हा नियोजन करलीत. नागपूरला एेवढी पावसाची तयारी नव्हती. पूर परिस्थिती हाताळण्यात प्रशासन, महानगरपालिका जबाबदार आहे.

दरम्यान पुण्यात गणेशोत्सवासाठी आलेल्या अमृता फडणवीस यांनी ढोल वादन केले. तसेच गाणेही म्हटले आहे.

Tags

follow us