Download App

पोलिसांकडून वारकऱ्यांवर लाठीचार्ज… औरंग्या नक्की कोणाच्या अंगात संचारला, विरोधकांचा सवाल

Ashadhi Wari 2023 : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी सोहळ्यासाठी राज्यासह इतर राज्यातून लाखों भाविक आळंदीत जमले होते. आज सायंकाळी चार वाजता माउलींच्या पालखी सोहळ्याचे मुख्य मंदिरातून पंढरीकडे प्रस्थान होणार होते. यावेळी पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक होऊन झटापट झाली. पोलिसांकडून वारकऱ्यांना झालेल्या लाठीचार्जचा विरोधी पक्षांनी निषेध करत राज्य सरकारवर जोरदार टीका आहे. (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2023)

औरंग्या नक्की कोणाच्या अंगात संचारला?
अरे अरे.. हिंदूत्ववादी सरकारचे ढोंग उघडे पडले.. मुखवटे गळून पडले..औरंगजेब यापेक्षा वेगळे काय वागत होता? वारकऱ्यांचा हिंदू आक्रोश सरकार असा चिरडून टाकतआहे. मोगलाई महाराष्ट्रात पुन्हा अवतरली आहे.. हे म्हणे हिंदुत्ववादी सरकार. वारकऱ्यांनी आज पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या. उद्या बंदुकांचा सामना करावा लागेल. हेच पाहायचे उरले होते.. तीर्थ पर्यटन करणारे मुख्यमंत्री कोठे आहेत? हिंदू आक्रोश मोर्चा काढणारे कोठे आहेत? देवेंद्र जी आता तुम्हीच सांगा तुमच्या राज्यात औरंग्या नक्की कोणाच्या अंगात संचारला आहे? महाराष्ट्रात मोगलाई अवतरली आहे.. दार उघड बये दार उघड! असा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

दोषी व्यक्तींची चौकशी करुन तातडीने कारवाई करा
वारकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या सरकारचा निषेध असो.! जे आजवर कधीही घडले नाही ते यावर्षी घडले. वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. यापुर्वी कधीही वारकऱ्यांवर बळाचा वापर केल्याची घटना घडली नव्हती. आपल्या साध्या आणि सोप्या शिकवणूकीतून वारकऱ्यांनी देशाला वेळोवेळी दिशा दाखविली आहे. माऊलींच्या दिंडी सोहळ्याला प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे गालबोट लागले. दिंडीसोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांवर झालेला लाठीहल्ला हा अतिशय संतापजनक प्रकार आहे. याप्रकरणी दोषी व्यक्तींची चौकशी करुन त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

आळंदीतील माऊली मंदिर परिसरात तणाव.. पोलीस-वारकऱ्यांमध्ये झटापट…

हिंदूत्ववादाचा डंका पिटणारे शिंदे फडणवीस सरकार ढोंगी
महाराष्ट्राला वारीची ३०० वर्षाची परंपरा आहे. या तीनशे वर्षांच्या परंपरेत प्रथमच वारीच्या पवित्र परंपरेला गालबोट लागून पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठी चार्ज केलेला आहे. तीनशे वर्षांमध्ये कधीही न झालेली गोष्ट शिंदे फडणवीस सरकारने करून दाखवली आहे. ही घटना अत्यंत निषेधार्ह आहे. हिंदूत्ववादाचा डंका पिटणारे शिंदे फडणवीस सरकार ढोंगी आहे, हेच यातून सिद्ध होते. सरकारने संयत अशा वारकरी बांधवांना काठी उगारायला लावू नये, असा हल्लाबोल राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

सरकारची काही जबाबदारी आहे की नाही ?
श्री क्षेत्र आळंदी येथे वारकरी बांधवांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे थोर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदीत वारकरी बांधवांचा झालेला हा अपमान अत्यंत निषेधार्ह आहे. वारकरी संप्रदाय, वारकरी बांधव यांच्याबद्दल सरकारची काही जबाबदारी आहे की नाही ? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे.

Women’s Junior Hockey Asia Cup: कोरियावर ऐतिहासिक विजय मिळवत, भारताने प्रथमच ज्युनियर महिला आशिया कप जिंकला

शिंदे फडणवीस सरकारला थोडी तरी लाज वाटते का?
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आळंदीमध्ये वारकऱ्यांवर पोलिसांकडून लाठी हल्ला. रात्रंदिवस महापुरुषांच्या विचारांचे सरकार आहे म्हणणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारला थोडी तरी लाज वाटते का? वारकऱ्यांवर हल्ला म्हणजे आमच्या अस्मितेवर हल्ला, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

Tags

follow us