Download App

पैशाची मागणी, गाडीत वाद अन् प्रेयसीची हत्या…, पुण्यात धक्कादायक प्रकार उघडकीस

Pune Crime :  सतत पैसे मागणे आणि चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये

  • Written By: Last Updated:

Pune Crime :  सतत पैसे मागणे आणि चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) घडली आहे. दिनेश ठोंबरे (Dinesh Thombre) असं अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकराचे नाव असून जयश्री मोरे (Jayashree More) असं हत्या झालेल्या प्रेयसीचे नाव आहे.

माहितीनुसार, दिनेश आणि जयश्री गेल्या पाच वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (live-in relationship) राहत होते आणि तीन वर्षांपूर्वी दोघांनी एका मुलालाही जन्म दिला होता. मात्र जयश्री दिनेशला सतत पैसे मागत होती आणि दिनेशला तिच्या चारित्र्यावर संशय आल्याने दिनेश जयश्रीची हत्या केली आणि मृतदेह पुणे-बेंगलोर महामार्गावरील खंबाटकी घाटात फेकून दिला.त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन प्रेयसी हरवल्याची तक्रार दाखल केली आणि आपल्या वर्षीय बाळाला आळंदीत सोडून दिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेशचं आधी एक लग्न झालेल होते आणि त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुलं आहेत तर जयश्रीचे सुद्धा लग्न झाले होते मात्र दोघांचा संसार टिकला नाही. त्यानंतर जयश्री आणि दिनेश एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. यानंतर दोन्ही वाकड परिसरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले आणि तीन वर्षांपूर्वी दोघांनी एका मुलाही जन्म दिला. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद होत होते.

जयश्री नेहमी दिनेशकडे पैशांची मागणी करत होती आणि जर पैसे दिले नाही तर सोडून जाईल अशी धमकी देत होती. त्यामुळे दिनेश संतापला होता. 24 नोव्हेंंबर रोजी भुमकर चौकाजवळ गाडीमध्ये त्यांच्यात वाद झाला तेव्हा दिनेशने गाडीतील हातोडा घेऊन जयश्रीच्या डोक्यात घाव घातला त्यात तिचा मृत्यू झाला. यानंतर दिनेशने मृतदेह पुणे-बेंगलोर महामार्गावरील (Pune-Bangalore Highway) खंबाटकी घाटमध्ये फेकून दिला. दुसऱ्या दिवशी वाकड पोलीस ठाण्यात प्रेयसी हरवली असल्याची तक्रार दिली.

मोठी बातमी! राणी लंके यांचा EVM पडताळणीसाठी अर्ज, ‘या’ बुथवरील मतांची पडताळणी होणार

या प्रकरणाचा तपास करताना हत्यामागे दिनेश असल्याचा पोलिसांना निष्पन्न झाले. याच बरोबर दिनेशने तीन वर्षीय मुलाला आळंदीत बेवारस सोडून दिले असल्याची देखील माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी दिनेशला अटक केली.

follow us