Santosh Chavan : केवळ गणेशोत्सव दिसतो का? बापटांना मारहाण करणारा संतोष चव्हाण नेमका कोण?

Vidyanand Bapat : पुण्यात डीजेबंदी विरोधात आवाज उठवणारे पर्यावरणप्रेमी विद्यानंद बापट यांना मारहाण करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे

Santosh Chavan

Santosh Chavan

Santosh Chavan : पुण्यात डीजेबंदीवर आवाज उठवणारे पर्यावरणप्रेमी विद्यानंद बापट यांना मारहाण करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बापट यांना मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवारांसह अनेक नेत्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे आता विद्यानंद बापट यांना मारहाण करण्याऱ्या आरोपीबद्दल प्राथमिक माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, बापट यांना मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव संतोष चव्हाण आहे.

पुण्यातील टिळक रोडवरील (Tilak Road) कशाळे चौकात आज (3 सप्टेंबर) एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देत असताना विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) यांना मारहाण करण्यात आली आहे. बापट एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देत असताना अचानक चव्हाण (Santosh Chavan) याने तू आमच्या गणोशोत्सवाला विरोध करतोस असं म्हणत बापट यांच्यावर हल्ला केला.

मारहाण करणारा संतोष चव्हाण नेमका कोण?

संतोष चव्हाणबद्दल सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, संतोष चव्हाण हा कोथरुड परिसरातील राऊतवाडी येथील रहिवासी असून तो एका स्थानिक बांधकाम व्यावसायिकाकडे नोकरी करत आहे. तसेच तो राऊतवाडी परिसरातील प्रियदर्शनी गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष देखील आहे. फक्त डीजेबंदीला विरोध केल्याने त्याने बापट यांना मारहाण केली की या हल्ल्यामागे आणखी काही कारण आहे याचा तपास आता पोलिसांकडून सुरु आहे.

विद्यानंद बापटांना मारहाण म्हणजे पिसाटलेल्या मानसिकतेचे लक्षण; रोहित पवार भडकले –

तर दुसरीकडे बापट यांना मारहाण केल्यानंतर माध्यमांशी बोलताना संतोष चव्हाण म्हणाला की, अजून याला मारायला पाहिजे.त्याला केवळ गणेशोत्सव दिसतो का? हिंदूंच्या सणावर टीका करण्याचे कारण काय? असं यावेळी संतोष म्हणाला. तर तुझी नेमकी भूमिका काय असं त्याला विचारले असता माझी कोणतीही भूमिका नाही, मला काही बोलायचेही नाही, फक्त बापटला अजून मारायचे होते असं देखील संतोष चव्हाण म्हणाला.

तर दुसरीकडे विद्यानंद बापट यांना मारहाण करणाऱ्या संतोष चव्हाण याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याची देखील माहिती समोर येत आहे.  राऊतवाडी परिसरात राहणारा संतोष चव्हाणवर पुणे शहरात पाच ते सहा गुन्हे दाखल आहे. मारामारी करणे, कट रचने यासारख्या गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी या आधीच त्याला ताब्यात घेतलं होतं. गणेश मंडळाचा कार्यकर्ता असलेला संतोष चव्हाण सराईत गुन्हेगार असून तीन वर्षांपूर्वी संतोष चव्हाणने वडिलांनाही  मारहाण केली होती. तेव्हापासून वडिलांनी त्याच्यासोबतचा संपर्कही तोडला होता.

दरम्यान आज सकाळी विद्यानंद बापट यांना मारहाण केल्यानंतर संतोष चव्हाण हनुमान नगर परिसरात येऊन काही मित्रांना भेटून देखील गेला मात्र त्यानंतर त्याने आपला फोन बंद केल्याने त्याचा ठाव-ठिकाणा लागत नव्हता अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने संतोष चव्हाण याला अटक केली आहे.

Exit mobile version