Download App

Kasba By Election : भाजपचे हेमंत रासने पिछाडीवर

पुणे : संपूर्ण राज्याच लक्ष लागून राहिलेल्या पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा निकालाचा दिवस अखेर उजाडला आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून या दोन्हा मतदासंघाच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली आहे.

कसब्यामध्ये मतमोजणीच्या चौथ्या फेरीअखेरीस महाविकास आघाडीचे उमेदवार 509 मतांनी पुढे असल्याची माहिती समोर आलीय. तर भाजपचे हेमंत रासने पिछाडीवर आहेत.

भाजपचा बालेकिल्ला समजला जाणार कसबा पेठ मतदारसंघात भाजपचे उमेदवार हेमंत रासने पिछाडीवर असल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजपचे हेमंत रासने यांना 14 हजार 382 मते मिळाली आहेत. भाजपकडून हेमंत रासने आणि महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर हे दोन दिग्गज उमेदवार मैदानात आहेत.

पिंपरी चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांची आघाडी

या दोन्ही उमेदवारांमध्ये काटे की टक्कर होणार असल्याचं भाकीत राजकीय विश्लेषकांकडून केलं जात होतं. अखेर भाजपचे उमेदवार हेमंत रासने पिछाडीवर असल्याने अखेरच्या फेरीपर्यंत कोण बाजी मारणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

हे क्रिकेटर्स केवळ क्रिकेटमध्येच नाही तर संगीतातही निष्णात आहेत, पाहा फोटो

दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीत उमेदवारीपासून ते मतदान होईपर्यंत अनेक नवनवीन ट्विस्ट समोर आले होते. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर एक महिन्यातच निवडणूक आयोगाकडून निवडणूका जाहीर करण्यात आल्या होत्या.

सुरुवातीला टिळक कुटुंबियांनाच उमेदवारी मिळणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, भाजपकडून हेमंत रासनेंना उमेदवारी जाहीर झाल्याने ब्राम्हण समाजात नाराजीचा सूर दिसून आला.

धंगेकरांचा अप्रत्यक्ष प्रचार करणे ही महागात पडले : मनसेतून थेट हकालपट्टी

तर महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी अनेकांची नावे चर्चेत आली होती. अखेर रविंद्र धंगेकरांना उमेदवारी देण्यात आल्याने निवडणुकीत नवा ट्विस्ट घडला होता. या मतदारसंघासाठी भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आपली प्रतिष्ठा पणाला लावण्यात आल्याचं पाहायला मिळालंय.

दरम्यान, अत्यंत चुरशीची मानली जाणाऱ्या या लढतीत कसबा पेठचा गड कोण राखणार? हे अद्याप गुलदस्त्यात असून कसब्याच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.अद्याप अंतिम निकाल जाहीर झाला नसून 3 वाजेपर्यंत अंतिम निकाल येणार असल्याची शक्यता आहे.

Tags

follow us