बारामतीमध्ये नणंद -भावजयी सामना, पण त्यापूर्वीच सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार यांची गळाभेट

Supriya Sule vs Sunetra Pawar : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी बारामतीत शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना रंगला आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यात लढत होण्याची चर्चा आहे. पण त्यापूर्वीच सुप्रिया सुळे यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांची गळाभेट भेट घेतली. आता दोघींच्या गळाभेटींने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बारामती तालुक्यातील […]

Supriya Sule Vs Sunetra Pawar

Supriya Sule Vs Sunetra Pawar

Supriya Sule vs Sunetra Pawar : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी बारामतीत शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना रंगला आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यात लढत होण्याची चर्चा आहे. पण त्यापूर्वीच सुप्रिया सुळे यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांची गळाभेट भेट घेतली. आता दोघींच्या गळाभेटींने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बारामती तालुक्यातील जळोची काळेश्वर मंदिरात दर्शनावेळी दोघेही समोरासमोर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी गळाभेट घेतली.

आगामी लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आमनेसामने येण्याची चर्चा आहे. शरद पवार गटाने सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार या अजित पवार गटाच्या उमेदवार असतील, असे जाहीर केले आहे.

मुंबईसाठी कॉंग्रेसकडून गोविंदा आणि राज बब्बर यांच्या नावांची चर्चा; ठाकरे गटाचाही हिरवा कंदील

बारामती लोकसभा मतदारसंघ गेल्या तीन दशकांपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. सुप्रिया सुळे गेल्या 15 वर्षांपासून बारामतीच्या खासदार आहेत. मात्र, जुलै 2023 मध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केल्याने दोन गट पडले आहेत. अजित पवार त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवार मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्यांदाच पवार कुटुंबीय निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

Congress च्या पहिल्या यादीत 15 सर्वसामान्यांसह SC-ST, OBC उमेदवारांची संख्या किती जाणून घ्या…

सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वीच सुनेत्रा पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. मी नवऱ्याच्या नावाने मतं मागत नाही. संसदेत नोटपॅड लागते तिथं पर्स नेऊन चालत नाही, असे म्हटलं होतं.

Exit mobile version