देशाच्या विकासात उद्योगपतींची मोठी भूमिका आहे. कारण उद्योगपती हे फक्त व्यवसाय करत नाहीत तर समाजासाठी देखील ते खूप करतात. आदर पुनावाला त्याचं एक उत्तम उदाहरण आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) यांनी व्यक्त केले आहे.
पुणे वैद्यकीय सेवा संशोधन प्रतिष्ठान यांच्यावतीने बाळासाहेब देवरस रुग्णालयाचे उद्घाटन झाले. त्यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सीरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी उपस्थित होते.
धमकीचा फोन! आमदार खोसकर रडत रडत म्हणाले…यांच्या हातून मरण्यापेक्षा मी आत्महत्या…
यावेळी बोलताना भैय्याजी जोशी म्हणाले की आजकालच राजकारण आणि वातावरण दुषित झालं आहे. पण आपलं केंद्र सरकार संवेदनशील आहे. एक संकल्प घेऊन आपण सगळे उभे आहोत. सामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले लोक आहेत, असंही यावेळी ते म्हणाले.
या देशात औषध नाही म्हणून कुणाचा जीव जण हे चांगल नाहीं म्हणून आरोग्य व्यवस्था नीट असण्याची गरज आहे. नव्या सरकारमध्ये भारतात आंतरराष्ट्रीय स्तराची आरोग्य विभागाची यंत्रणा उभी राहत आहे. जगाच्या सोबत जायचं आहे, ही भावना उराशी बाळगून काम करणारे लोकं आपल्या देशात आहेत, ते राजकीय नाहीत तर सगळ्या क्षेत्रात आहेत.
‘ही तर गुलाबो गँग’, म्हणत राऊतांनी गुलाबरावांना डिवचले
ते पुढे म्हणाले की एके काळी आपल्या देशात स्वतःला धान्य पुरत नव्हत, पण सध्या आपण सुरक्षा, शिक्षण, आरोग्य या सगळ्या क्षेत्रात आपणं खूप पुढं गेलो आहोत. यात सगळ्यांचच योगदान आहे. गेल्या काही वर्षांत देशातील अनेक धार्मिक स्थळांनी देखील आरोग्य क्षेत्रात खूप काम केलं आहे. असं देखील जोशी यावेळी म्हणाले.