Download App

Pune Breaking : नदी पात्रात सापडले नारायणेश्वर मंदिराचे अवशेष?

  • Written By: Last Updated:

Pune Breaking : नदी पात्रात साफसफाई दरम्यान सापडले नारायणेश्वर मंदिराचे अवशेष सापडले आहेत. बडी दर्गा जवळच्या नदी पात्रात तीन पायरी समाधी सापडली आहे. तसेच नदी सुधार योजनेच्या कामादरम्यान पिंड आणि ब्रिटिशकालिन बंदूक सापडली आहे.

मागील अनेक दिवसांपासून पुणे शहरातील पुणेश्वर आणि नारायणेश्वर या मंदिरांचा वाद सुरू असलेल्या चित्र पाहायला मिळत होतं. मात्र, आता पुण्यातील नदीपात्राजवळ ज्या ठिकाणी बडी दर्गाह आहे. त्याच ठिकाणी साफसफाई सुरू असताना नारायणेश्वर मंदिराचे अवशेष सापडल्याची माहिती इतिहास अभ्यासकांनी दिलेली आहे.

अयोध्या में शंखनाद, आ रहे हैं एकनाथ; मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याचा टीझर लॉन्च – Letsupp

इतिहास अभ्यासक नंदकिशोर एकबोटे यांनी याविषयी सांगितले की, मागील अनेक दिवसांपासून पुणे शहरातील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर या मंदिरांचा वाद सुरू असलेल्या चित्र पाहायला मिळत होतं. बडी दर्गा आणि छोटी दर्गा या दोन्ही ठिकाणी पुणेश्वर आणि नारायणेश्वर मंदिरे असल्याचा दावा केला जातोय. परंतु, आता पुण्यातील नदीपात्राजवळ ज्या ठिकाणी बडी दर्गाह आहे. त्याच ठिकाणी साफसफाई सुरू असताना नारायणेश्वर मंदिराचे अवशेष सापडले आहे.

Tags

follow us