Pune Drugs Case : शिक्षणाचे माहेर घर आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Pune)ड्रग्ज प्रकरणाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे थेट राजधानी दिल्लीपर्यंत (Delhi)असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहेत. पुणे पोलिसांच्या (Pune Police)गुन्हे शाखेने आत्तापर्यंत पुणे आणि दिल्लीमध्ये छापेमारी केली आहे. या छापेमारीत पुण्यामध्ये आत्तापर्यंत 717 किलो तर दिल्लीमध्ये 970 किलो एमडी जप्त करण्यात आले आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी एकून 1700 किलो एमडी जप्त केले आहे. याची किंमत तब्बल तीन हजार कोटींहून अधिक आहे. ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. त्याचबरोबर दिल्लीमधून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar)यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे.
अशोक चव्हाण, नारायण राणे अन् SM कृष्णा.. माजी मुख्यमंत्र्यांनीही सोडला काँग्रेसचा ‘हात’
यावेळी पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, ड्रग्ज रॅकेट प्रकरणात आत्तापर्यंत आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आत्तापर्यंत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुणे आणि दिल्लीमध्ये छापेमारी केली आहे. पोलिसांच्या मोहिमेमध्ये पुण्यात आत्तापर्यंत 717 किलो आणि दिल्लीत 970 किलो असे एकूण 1700 किलो एमडी जप्त केले आहे.
Arjun Kapoor : मी कधीही इंसेक्योर एक्टर नव्हतो! असं का म्हणाला अर्जुन?
यापूर्वी पुण्यात तीन जणांना आणि आता दिल्लीमध्ये पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या रॅकेटची पाळमुळं सांगली जिल्ह्यातही पसरल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात देखील शोध मोहीम सुरु केली आहे. पुण्याच्या बाहेर गुन्हे शाखेचे 15 पथकं रवाना झाली आहेत.
या ड्रग्ज रॅकेटमध्ये परदेशी व्यक्तीचा सहभाग असल्याचेही यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर सॅम ब्राऊन नावाने फिरणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत. काही एमडी हे लंडनला गेल्याचेही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
यापूर्वीच्या ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये काही राजकीय नेत्यांवर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणामध्ये तसा काही राजकारण्याचे धागेदोरे हाती लागले का? असा प्रश्न पोलीस आयुक्तांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सांगितले की, या प्रकरणामध्ये अद्यापतरी कोणतेही राजकीय लोकांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही.