Download App

पक्षीप्रेमी पुणेकरांनो सावधान! पारव्यांना दाणे टाकल्यास 500 रुपये दंड

पुणे : पारव्यांना (pigeons)खाद्य पुरवल्यानं ते धष्टपुष्ट होऊन पारव्यांची पैदास सतत वाढत असल्याचं दिसून आलंय. पुण्यातील (pune)नदीकाठ परिसर सिद्धेश्वर घाट सारसबाग (Sarus Baug), शनिपार आदी ठिकाणी कबूतर किंवा पारव्यांचे थवे पाहायला मिळतात. तर काही नागरिकांचं या परव्यांना खाद्य पुरवणं हे रोजचंच काम आहे. पारव्यांना खाद्य पुरवणं म्हणजे एक प्रकारे पुण्य कमवत असल्याची त्यांची भावना असते. त्या भावनेतूनच ते पक्षांना खाद्य पुरवत असतात. परंतु या पारव्यांमुळं न्यूमोनिया (pneumonia)आणि श्वसनाचे इतर आजार (Respiratory diseases)होत असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांचं (Health Officer)मत आहे. म्हणूनच महापालिकेकडून (Pune Mahapalika)या पारव्यांना खाद्य टाकणाऱ्यांना दंड (Penalty)भरावा लागणार आहे.

शहरात पारव्यांना दाणे टाकणाऱ्यांचं प्रमाण अलीकडं जरा जास्तच दिसत आहे. त्यामुळं अनेक परिसरात पारव्यांचे थवेच्या थवे पाहायला मिळतात. या पारव्यांचा थवेच्या थवे परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण करत असल्याचंही दिसून आलं आहे. तसेच पक्षांनी केलेल्या घाणीमुळं आणि त्यांच्या पंखातून उडणाऱ्या जंतूंचा नागरिकांच्या फुफ्फुसात शिरकाव होऊन आजार होण्याची शक्यता आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

शेतकरी, कष्टकरी देणार मुख्यमंत्री शिंदेंना टक्कर

पारव्यांमुळं किंवा त्यांच्या विष्ठेतून म्हणजे जरी ती विष्ठा सुकली तरी त्याच्यातून फंगस काही जिवाणूंचा प्रसार होऊ शकतो. मुळातच निसर्गात प्रत्येक प्राण्याच्या आतड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जिवाणू, विषाणू हे असतातच पण ते दुसऱ्या प्राण्यांसाठी घातक ठरू शकतात. तसं त्यांच्या विष्ठेमध्ये जसे काही फंगस, जिवाणू विषाणू अरण्याची शक्यता असल्याचं पुणे महापालिकेच्या प्रभारी आरोग्य आधिकारी डॉ. कल्पना बळीवंत (Dr.Kalpana baliwant)यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे ज्यांना मूळात अॅलर्जीचा त्रास आहे, काही लोकांना डस्टच्या अॅलर्जीचा त्रास असतो, काही लोकांना आम्लपदार्थाची अॅलर्जी असते, त्यांची श्वसनसंस्था कमजोर असते, अशा लोकांना तर या विष्ठेचा अधिक त्रास होण्याची शक्यता असते.

त्यामुळं पारव्यांच्या संबंधीत या अडचणी निर्माण झाल्या आहेत. तो जरासा त्रासदायक आहे. शहरात अनेक ठिकाणी बिल्डींगच्या कोपऱ्यात कबूतरं, पारवी अंडी घालतात. तीथं त्यांचं सर्व सायकल चालू असते. तर यामध्ये बिल्डींगमधील लोकांनी याची काळजी घेतली पाहिजे असंही यावेळी डॉ. कल्पना बळीवंत यांनी सांगितलं आहे.

ज्या ठिकाणी बिल्डींगमध्ये पारवे, कबूतरं राहत आहेत, ते त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी लगेचंच नष्ट कराव्यात असं आवाहन डॉ. बळीवंत यांनी केलं आहे. काही ठिकाणी अनेक नागरिक पक्ष्यांना दाणे टाकत असतात, त्यामुळं त्या पक्षांना एका ठिकाणी अन्न मिळाल्यानं त्या ठिकाणी ते जास्त प्रमाणात राहतात. त्यामुळं त्यांचं प्रजननही अधिक जलद गतीनं होतं, तर तेही नागरिकांनी बंद करावं असंही त्यांनी सांगितलं आहे.

आम्ही सर्व 15 विभाग क्षेत्रीय कार्यालयाच्या सॅनिटरी विभागांतर्गत विभागीय आरोग्य निरीक्षक कार्यरत आहेत, त्यांना आम्ही असे आदेश काढले आहेत. त्याबाबत महापालिका सहाय्यक आयुक्तांनाही तसं पत्र दिलेलं आहे. की त्यांना कुठे अशा प्रकारच्या तक्रारी आहेत किंवा त्यांना जिथं दिसत आहेत, त्या त्यांनी तातडीनं नष्ट करुन त्यावर किटकनाशक फवारणी करावी असंही सांगितलं आहे.

जर एखाद्या ठिकाणी कोणी अशा प्रकारे पारव्यांना दाणे टाकताना दिसले तर त्यांना 500 रुपये शुल्क आकरलं जाणार आहे. त्यामुळं आता पुणेकरांना पारव्यांना, कबूतरांना आपलं पक्षीप्रेम कमी करावं लागणार आहे. नाहीतर अशा प्रकारे कोणी पारव्यांना काही दाणे टाकताना आढळल्यास 500 रुपयांचा दंड भरावा लागेल.

Tags

follow us