BJP is leading in 24 seats in postal votes in Pune Municiple Council Election : राज्यातील 29 महापालिकांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. आज सकाळी सुरूवातीला पोस्टल मतांची मोजणी झाली. त्यामध्ये पुण्यात भाजप 24 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे. त्यानंतर आता 10 वाजता पासून मशीनची मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
पुणेकरांचा कौल कोणाला? पुणे शहरात 52.42 टक्के मतदान
पुणे शहरात 41 प्रभागातील 163 नगरसेवकांसाठी मतदान प्रक्रिया संपन्न झाली असून, 18 लाख 62 हजार पुणेकरांनी बजावला मतदानाचा हक्क बजावला आहे. सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग कमी होता, मात्र संध्याकाळी मोठ्या संख्येने पुणेकर बाहेर पडले.
एकूण मतदार: 18 लाख 62 हजार 408
पुरुष मतदार: 9 लाख 73 हजार 508
महिला मतदार: 8 लाख 88 हजार 809
इतर मतदार: 93
सर्वाधिक मतदान झालेला प्रभाग: शिवणे खडकवासला प्रभाग 33 (58 टक्के)
सर्वात कमी मतदान झालेला प्रभाग: औंध बोपोडी, प्रभाग 8 (45 टक्के)
