नाना पटोलेंवर जगदीश मुळीक बरसले! म्हणाले तोंडाच्या वाफा टाकणाऱ्यांनी…

Jagdish Mulik Vs Nana Patole : काँगेसचे राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी यांचे कुख्यात गँगस्टर अतिक अहमद यांचे संबंध ही काँग्रेसची मानसिकता दाखवण्यासाठी पुरेशी असून सतत तोंडाच्या वाफा टाकणाऱ्या काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावर काही बोलणार आहे की नाही, असा टोला भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी लगावला आहे. क्रूरकर्मा अतिक अहमद असो नाहीतर भारतमातेचा दुष्मन […]

Nana Patole Jagdish Mulik

Nana Patole Jagdish Mulik

Jagdish Mulik Vs Nana Patole : काँगेसचे राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी यांचे कुख्यात गँगस्टर अतिक अहमद यांचे संबंध ही काँग्रेसची मानसिकता दाखवण्यासाठी पुरेशी असून सतत तोंडाच्या वाफा टाकणाऱ्या काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावर काही बोलणार आहे की नाही, असा टोला भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रातून काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभेवर गेलेले खासदार इम्रान प्रतापगढी यांचे आणि कुख्यात गँगस्टर अतिक अहमद यांचे संबंध काय आहेत, असे ट्विट करत जगदीश मुळीक यांनी नाना पटोले यांना डिवचले आहे.

Uddhav Thackeray : आनंदाच्या शिध्यातील कडधान्याला बुरशी लागली… मालिकांच्या आरोपांवर तोंड उचकटा! – Letsupp

जगदीश मुळीक यांनी अतिक अहमद, अश्रफ अहमद आणि इम्रान प्रतापगढी यांचा भेटीचा फोटो ट्विट करत नाना पटोले यांच्यावर निशाणा साधत जगदीश मुळीक म्हणतात की, सतत तोंडाच्या वाफा टाकणाऱ्या नाना पटोले यांचे आता यावर नेमकं काय म्हणणे आहे.

क्रूरकर्मा अतिक अहमद असो की भारतमातेचा दुष्मन यासिन मलिक असो. या सर्वांच्या लांगूलचालनासाठी काँगेसने कायमच देशाच्या दुष्मनांना साथ दिल्याचा इतिहास आहे, अशी टीका देखील यावेळी जगदीश मुळीक यांनी नाना पटोलेंवर केली.

Exit mobile version